निरा भिमाचे ऊस लागवड धोरण जाहीर : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) –  शहाजीनगर( ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे सन २०२०-२१हंगामा साठीचे ऊस लागवडीचे धोरण जाहीर करण्यात आले असुन या धोरणानुसार ऊस उत्पादन तंत्राचा अवलंब करून शेतकर्‍यांनी कारखाना क्षेत्रात जास्तीत जास्त क्षेत्रावरती ऊस लागवड करून ऊसाचे प्रति एकरी सुमारे शंभर टणापेक्षाही जास्तीचे ऊस उत्पादन घ्यावे,असे आवाहन राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री तथा निरा-भीमा सहकारी साखर कारखाण्याचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शहाजीनगर येथे बोलताना व्यक्त केले.

हर्षवर्धन पाटील यांनी निरा- भीमा कारखान्याचे ऊस लागवडीचे धोरण पुढील प्रमाणे जाहीर केले असुन आडसाली- ऊस लागवड कालावधी १५ जुलै ते ३१ ऑगस्ट म्हणजेच ४८ दीवस, (लागवड क्षेत्र १५ टक्के)- को.८६०३२, व्ही.एस.आय.८००५, फुले ०२६५ इत्यादी,पूर्व हंगाम – (लागवड कालावधी एक सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर, ९१ दिवस(लागवड क्षेत्र ३० टक्के)- कोसी ६७१, को.८६०३२, व्ही.एस.आय.८००५, फुले ०२६५, एम.एस.१०००१इत्यादी., सुरू(लागवड कालावधी एक डिसेंबर ते २८ फेब्रुवारी,दिवस ९०)(लागवड क्षेत्र १५ टक्के)-कोसी ६७१ को.८६०३२, व्ही.एस.आय.८००५, एम.एस.१०००१ तसेच लागवड कालावधी एक डिसेंबर ते ३१ जानेवारी, ६२ दिवस (लागवड क्षेत्र १५ टक्के) – फुले ०२६५ इत्यादी, व खोडवा- (लागवड- कारखाना सुरू झालेपासून ते बंद होईपर्यंत (लागवड क्षेत्र ४० टक्के)- वरील सर्व जाती से राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

ऊसाची लागण पूर्ण होताच शेतकऱ्यांनी त्या क्षेत्राची नोंद त्याच दिवशी शेतकी विभागाकडे देणे बंधनकारक आहे.तसेच जेवढ्या क्षेत्राची लागण पुर्ण झाली आहे, तेवढ्याच क्षेत्राची लागण तारीख ग्राह्य धरली जाणार असुन ऊस उत्पादक शेतक-यांनी योग्य बेण्याची योग्य निवड करणे, बेणे प्रक्रिया, लागवड पध्दती,रोप लागण पध्दत, रासायनिक खतांच्या मात्रा, ठिबक मधून द्यायवयाची खते, किड व रोगांचे नियंत्रण या प्रमाणे ऊस उत्पादनाचे तंत्र वापरल्यास प्रति एकरी शंभर टनापेक्षाही जास्तीचे उत्पादन घेता येणार असुन ऊस तोडणीच्या कार्यक्रमात ऊस लागवड तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार कोसी ६७१, व्ही.एस.आय.८००५ व व्ही.एस.आय.१०००१ या लवकर पक्व होणा-या व जादा साखर उतारा असणार्‍या ऊस जातींची प्राधान्याने तोडणी करण्यात येईल. त्यानंतर को.८६०३२ या ऊस जातीची तोडणी करण्यात येईल व त्यानंतर फुले २६५ या ऊस जातीची तोडणी ही लागण तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार केली जाईल ,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगीतले.

निरा भिमा कारखाना ऊस विकास योजना प्रभावीपणे राबवित आहे. त्यामध्ये ठिबक सिंचन योजना, बेणे पुरवठा, माती परीक्षण यांचा ऊस उत्पादक शेतक-यांनी लाभ घ्यावा.तसेच कारखान्याकडील उत्पादित सेंद्रिय खतांचा वापर हा ऊस उत्पादक शेतक-यांनी करावा, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार, प्रभारी कार्यकारी संचालक एस.जी.गेंगे-पाटील उपस्थित होते.