Indapur News | भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या सुपुत्राचा ज्येष्ठ शिक्षकाशी वाद; ऑडिओ क्लिप व्हायरल, इंदापूर तालुक्यात खळबळ

इंदापूर  : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – भाजपा नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील (Rajwardhan Patil) आणि त्यांच्याच शिक्षण संस्थेत कार्यरत असलेला जेष्ठ शिक्षक यांच्यात झालेल्या वादाची इंदापूर तालुक्यात (Indapur taluka) चर्चा रंगली आहे. संबधित शिक्षकाने शिक्षण संस्थेची निगडित असलेल्या एका व्हाट्सअप ग्रुपवर इंदापूरचे आमदार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे ग्रुपवर फोटो का टाकला, याचा जाब विचारण्यासाठी राजवर्धन पाटलांनी शिक्षकाला आपल्या मोबाईलवरुन संपर्क साधला. दोघात झालल्या शाब्दीक खडाजंगी संभाषणाचे सर्व रेकॉर्डिंग या शिक्षकाने आपल्या मोबाईलमध्ये केले. त्यानंतर ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये (Audio clip in social media) प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे इंदापूर (Indapur News)  तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

या क्लिपमध्ये राजवर्धन पाटील हे रागात बोलत असले तरी समोरील शिक्षकाला (Teacher) त्यांनी एकही शब्द एकेरी वापरला नाही. ज्या संस्थेत आपण काम करतो त्यांच्याशी प्रामाणिक रहा, असे सांगत आहेत. मात्र समोरील व्यक्तीने पाटील यांना नातवाच्या वयाचे संबोधत एकेरी संवाद साधला आहे. तसेच शिक्षकाने संयमाने न बोलता राजवर्धन यांना बोलायला भाग पाडल्याची चर्चा आहे. दरम्यान या क्लिपवरून तालुक्यातील राजकारण (Politics) पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. संस्थेतील कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी करणे योग्य नाही. असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. तर ज्या शिक्षकांना राजवर्धन यांनी जाब विचारला, त्या शिक्षकाने असभ्य भाषेत वर्तन केले हे शिक्षकी पेशाला अशोभनीय असल्याचे म्हणत पाटील यांना पाठबळ दिले जात आहे.

Web Titel :- Indapur News | bjp leader harshvardhan patils son argues senior teacher discussion stirred political atmosphere

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक