Indapur News : ट्रक चोरीचा 24 तासात छडा लावण्यात इंदापूर पोलीसांना यश

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – रांजणगाव एमआयडीसी येथुन वर्लफुल कंपनीचे फ्रिज पाँडेचरी येथे घूवुन जात असताना पूणे सोलापूर हायवे वरील इंदापूर नजिक कंटेनर चालक याने ट्रक उभी केली व गाडीतुन खाली उतरून रस्त्याच्या बाजुला प्रातविधीसाठी गेला असता अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने कंटेनर ट्रक मालासह पळवुन नेल्याची घटना इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाक्यापासुन तीन चार कि.मी. अंतरावर घडल्याबाबतची फिर्याद कंटेनर चालक अरविंद कुमार सिंग, (वय ३२) रा. बिसब्रापुर, ता. कल्याणपूर,जि. मतीहारी (बिहार) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली.

फिर्यादी हे व्यवसायाने ड्रायव्हर असुन ते कंटेनर ट्रक क्र.एन.एल.०१, एए ५१७० या गाडीमध्ये रांजणगाव एमआयडीसी येथुन १२९ फ्रीज भरून ते पाँडेचरी याठीकाणी पोहच करण्यासाठी पूणे सोलापूर हायवे रोडने सोलापूरच्या दीशेने निघाले होते.ते दिनांक २५ फेब्रुवारी रोजी त्यांची तब्येत व्यवस्थित नसल्याने ते इंदापूर नजिक सरडेवाडी टोलनाक्याचे पुढे लगत गाडी उभी करून गाडीतच झोपले व दुसर्‍या दिवशी सकाळी दि.२७ रोजी उठुन पूणे सोलापूर हायवेने सोलापूर बाजुस तीन चार कि.मी. गेल्यानंतर सकाळी ८:३० वा.चे सुमारास रस्त्याचे कडेला गाडी उभी करून, ड्रायव्हर गाडीतुन खाली उतरून प्रातविधीसाठी गेला होता. त्यावेळी त्यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व कन्टेंनरची चावी तशीच गाडीत राहीली होती.

प्रातविधी करून परत आल्यानंतर त्यांची गाडी उभी केलेल्या ठीकाणी दीसुन न आल्याने त्यांने कंन्टेनर व त्यातील १२९ फ्रिज किंमत १६ लाख,८६ हजार,५० रूपये किमतीच्या मालासह चोरी झाल्याबाबतची तक्रार इंदापूर पोलीसात दीली होती.घटनेचे गांभिर्य ओळखुन इंदापूर पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक धण्यकुमार गोडसे यांनी पूणे ग्रामिण पो. अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पो.अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पो. अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली शोध घेणे कामी सहाय्यक पो. निरिक्षक अजित जाधव व टी. एस. मोहिते व काही पोलीस कर्मचारी यांचे विशेष पथक तयार करून सोलापूर, उस्मानाबाद, लातुर जिल्ह्यात तपासासाठी पाठवण्यात आले.

अज्ञात चोरटा व गुन्ह्यात चोरी गेलेला माल शोध तपास करत असताना तपास पथकाला बार्शी लातुर महामार्गावरील कुसळंब टोलनाक्याचे पुढे काही अंतरावर चोरीस गेलेला कंन्टेनर हा ९८ फ्रीजसह मिळुन आला.तर त्यातील ३१ फ्रिज चोरट्यांनी चोरून नेले होते. सदरचे चोरी गेलेले ३१ फ्रिज हे नाकाबंदीदरम्यान परभणी पोलीसांना मीळुन आले. तर सदरची चोरी करणारे आरोपी यांचेबाबतची पूर्ण माहीती इंदापूर पोलीसांना मिळाली असुन लवकरच आरोपी पोलीसांच्या हाती लागणार असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली. तर या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित जाधव, स. पो. नि. टी. एस. मोहिते, पो. हवा. दिपक पालखे, सुरेंद्र वाघ, पो. ना. काशिनाथ नागराळे, पो. काँ. विनोद मोरे ,अर्जुन भालसिंग, संजय कोठावळे, व तांत्रीक मदतनिस पो. काँ. सचिन गायकवाड यांचे पथकाने लावला असुन बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले. पुढील तपास स. पो. नि. टी. एस. मोहिते हे करत आहेत.