कर्मयोगीचे चालु हंगामात 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : हर्षवर्धन पाटील

इंदापूर  : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे)  –  बीजवडी (ता.इंदापूर) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे यंदाचे गळीत हंगामात 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासदांनी नोंदलेला सर्व ऊसगाळप करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री व कर्मयोगीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

मंगळवार दि. 2 जून रोजी बिजवडी येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात ऊस तोडणी कामगार व वाहतूकदार यांच्या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ऊस वाहतूक वाहनधारकांचे ऊस तोड्णी वाहतूकीच्य करारास शुभारंभ करण्यात आला. वाहतूक करणाऱ्या वाहन धारंकाना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा उचलीचे वाटप करण्यात आले आहे .यावेळी पाटील बोलत होते.ते पुढे म्हणाले की कर्मयोगी साखर कारखान्याच्या वाहतूक कराराला सुरुवात झाली असून 500 बैल गाड्या, 450 ट्रक व ट्रॅक्टर,5 हार्वेस्टर आणि 400 बजाट याचे नियोजन केलेले आहे.

यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात 35 हजार एकराची नोंद झाली असून 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवलेले आहे उसाची परिस्थिती उत्तम असून यंदा पावसाचे लवकर आगमन झालेने एकरी ऊस उत्पादनात वाढ होणार असली तरी सभासदांचा नोंदलेला सर्व ऊस गाळपाला घेणार आहोत. गेल्या गळीत हंगामात दुष्काळामुळे व उस वाहतूक यंत्रणेच्या कमतरतेमुळे सर्वच कारखान्यांचे गाळप कमी प्रमाणात झाले. यंदाच्या गळीत हंगामाची सर्व तयारी जवळपास पूर्ण होत आली असून लॉक डाऊन उठल्यानंतर कारखाना मशिनरीची दुरुस्ती सुरू करण्यात येणार असून जुन्या प्लॅन्ट मध्ये मशिनरीची निगा व दुरूस्तीची गरज नसून नवीन प्लॅन्ट मध्ये ती केली जाणार आहे. बॉयलींग हाऊस तसेच आसावनी प्रकल्प सुस्थितीत असून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अधिकारी-कर्मचारी हे चांगल्या पद्धतीने नियोजन करणार असल्याचे पाटील यांनी सांगीतले.

ऊस उत्पादक शेतकरी व वाहन धारंकाचे काही देणे राहिलेले आहेत.तर कामगारांच्या पगाराचा प्रश्न देखिल संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन तातडीने मार्गी लावण्यात येणार आहे. यावरती योग्य त्या उपाय योजनेचे कामकाज जलद गतीने सुरू आहे. कारखान्याना एफआरपी प्रमाणे सर्व रक्कम उस उत्पादकांना अदा करणार आहे.तरी सभासदांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यास पिकवीलेला सर्व ऊस गाळपासाठी द्यावा असे आवाहनही पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले. तर सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक शरद काळे यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक भरत शहा, भास्कर गुरगुडे, सुभाष काळे व सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते .