आरोग्य कर्मचार्‍यांच्या हातुन बलशाली भारत घडविण्याचे पवित्र कार्य : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – २१ व्या शतकातील बलशाली भारत घडविण्याचे पवित्र कार्य पल्स पोलिओ लसीकरण मोहिम कार्यक्रामाच्या माध्यमातुन आरोग्य कर्मचारी करत असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लासुर्णे, ता. इंदापूर येथे बोलताना काढले.

राष्ट्रीय पल्स पोलिओ दिनानिमित्त लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाच बालकांना दत्तात्रय भरणे यांनी पोलिओ डोस पाजून पल्स पोलिओ मोहीमेचा केला शुभारंभ केला.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आरोग्य विभाग कर्मचारी यांचे वतीने दत्तात्रय भरणे यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या मोहिमेअंर्तगत वाड्या – वस्ती याठिकाणी असलेला बालक या मोहिमेपासून वंचित रहाणार नसल्याची खबरदारी प्रत्येक आरोग्य कर्मचारी यांनी घ्यावी असे मत व्यक्त केले.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. वैशाली ताई पाटील, माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, जेष्ठ नेते दत्तामामा घोगरे, जि. प. सदस्य अभिजितभैय्या तांबिले, तेजसिंह पाटील, सुहास डोंबाळे, शिवसेनेचे गणेश फडतरे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री अमोल पाटील, डाॅ योगेश पाटील, पंचायत समिती सदस्या सौ सारीकाताई संजीव लोंढे, दादासाहेब वणवे, सागर मिसाळ, हामा पाटील, योगेश डोंबाळे पाटील, कौस्तुभ पाटील, लासुर्णे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. विमल जळक, बापूराव खरात, मनोज कुलकर्णी, राजेंद्र वाकसे, तुषार घाडगे, संजीव लोंढे, हरीभाऊ वाघमोडे, नेताजी लोंढे, संतोष लोंढे, हर्षवर्धन लोंढे सर, पिपा लोंढे, सचिन खरवडे, नितिन कोळेकर , दिपक लोंढे, यांच्यासह लासुर्णे आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी स्टाफ, लासुर्णे परिसरातील ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर पाटील सर यांनी केले तर आभार निखिल भोसले यांनी मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/