इंदापूर : भरधाव गाडी उड्डाण पुलाला धडकल्याने एकाचा मृत्यू

इंदापूर : इंदापूर शहरातील पूणे सोलापूर बाह्य वळण महा मार्ग, इंदापूर- अकलुज रोडवरील ऊड्डाण पूलाच्या कठड्याला भरधाव स्विप्ट कारची जोराची धडक बसल्याने गाडी चालक राजु सहदेव भोंग. रा.इंदापूर, जि. पूणे. याचा जागीच मृृत्यु झाल्याची घटना शुक्रवार दि. ८ मे रोजी दुपारी चार वा.चे सुमारास घडली असल्या बाबतची माहीती इंदापूर पोलीस स्टेशन ठाणे अमलदार रासकर यांनी दीली.

याबाबतची खबर मयत इसमाचे चुलत भाऊ संजय महादेव भोंग.रा. अंबिकानगर- इंदापूर,जि. पूणे यानी इंदापूर पोलीसात दीली आहे.अपघातातील मयत राजु भोंग हे त्यांचे ताब्यातील पांडर्‍या रंगाची स्विप्ट डिझायर गाडी नं. एम.एच.४२, ए. एस.८६०४ या गाडीने स्वत: ड्रायव्हिंग करत अकलुज बाजुकडून इंदापूर बाजुकडे भरधाव वेगाने येत होते. इंदापूर गावच्या हद्दीतील अकलुज रोडच्या उड्डाणपुलाजवळ गाडी आली असता त्यांना गाडीचा वेग आवरता न आल्याने भरधाव गाडी अकलुज उड्डाण पुलाच्या कठड्याला जोरात धडकुन अपघाताची घटना घडली आहे.प्रत्यक्षदर्शींच्या माहीतीनुसार गाडीचा वेग इतका जास्त होता की गाडीची पुलाला धडक बसल्यानंतर गाडीने चार पलट्या खाल्याने गाडीचा चक्काचुर झाला व चालक गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.