२० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणारे गजाआड

इंदापूर : सुधाकर बोराटे – इंदापूर येथील डाळींब व्यापाऱ्याचे २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या दोन इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

सौरभ बाळु तरंगे (वय२० वर्षे रा.बळपूडी ता.इंदापूर, जि. पुणे) व राहुल दत्तू गडदे (वय ३८ वर्षे, रा. डोंबाळवाडी,ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी दोघांची नावे आहेत. एडीसन मैथ्यु (वय ४०वर्षे, रा.मुळ.वारोर हाऊस पेरीनल्लोर एडामोलाकेल जि.कोल्लम,(केरळ) व सध्या रा. इंदापूर, दर्गाह मश्जिद चौक,इंदापूर,जि. पुणे) असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,   २४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी निमगाव केतकी- इंदापूर रोडवरील वेताळबाबा मंदीर जवळून इंदापूरचे डाळींब व्यापारी एडीसन मॅथ्यू यांचे तोंडाला रूमाल बांधलेल्या अज्ञात सात चाकुने वार करून  अपहरण केले होते. त्यानंतर  २० लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. त्यानंतर  एडीसन मैथ्यु यांनी  २६  फेबुरवारी रोजी सायंकाळी इंदापूर पोलीसात दाखल केली होती.

गुुन्ह्याचा तांत्रिक तपास करत  इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस निरिक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपनिरिक्षक राम गोमारे व त्यांचे गुन्हे अन्वेशन पथकाने दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी  उडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांना पोलीसी खाक्या दाखविताच गुन्हा केल्याचे कबूल केले.

 राहूल गडदे हा डाळींब व्यापारी आहे. तर  एडीसन मॅथ्यु हेही डाळींबाचाच व्यापार करतात.  ते  शेतकर्‍याकडील डाळींब चांगल्या दराने खरेदी करत होते. त्यामुळे त्याचा फटका राहूल गडदे याच्या धंद्यावर होत होता.त्याचे शेतकऱ्यांशी झालेले अनेक व्यवहार मॅथ्यु यांच्यामुळे मोडले होते. त्याच्या व्यवसायात आडकाठी ठरणाऱ्या एडीसन मॅथ्यु याचे खंडणीसाठी अपहरण करण्याची सुपारी कोल्हापूर येथील  मित्रांना  ५० हजार रूपयांना दिली.  त्यांना महाराष्ट्रात व्यवसाय करू द्यायचा नाही. या हेतूने कट रचून डिळींब व्यापार्‍याचे अपहरण केले होते. त्यांना  न्यायालयात हजर केले असता २३ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील,बारामती अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मिना, बारामती उपविभागीय पोलीस अधीकारी नारायण शिरगावकर, इंदापूर पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस उपनिरिक्षक राम गोमारे, कर्मचारी शिरिष लोंढे, राहुल बडे यांनी केली.

You might also like