डिझेल चोरी करणार्‍या चोरट्यांना इंदापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाईन

सुधाकर बोराटे

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री अपरात्री रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मोठ्या वाहणातून डिझेल चोरी करणाऱ्या परराज्यातील टोळीला इंदापूर पोलीसांनी शिताफीने पकडून गजाआड केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bf372bd6-c192-11e8-baf4-85c4f42d0ac5′]

२५ सप्टेंबर रोजी रात्री धोंडीराम बाबू खरात हे त्यांची चौदा टायर ट्रक रात्र झाल्याने काळेवाडी येथे पुणे सोलापूर हायवेवर रस्त्याच्या कडेला लावून गाडीत झोपले होते. त्यांच्या गाडीतील डीझेल टाकीतील अंदाजे १४० लीटर डीझेल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरल्याबाबत त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती.

नोकर भरती घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी माजी नगराध्यक्ष काॅंग्रेसच्या मोर्चात 

बारामती उपविभागीय पोलीस अधीकारी नारायण शिरगावकर यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे काल रात्री पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांना गुप्त खबर्‍यामार्फत यां खबर मिळाली की, वर नमुद गुन्हयातील आरोपी हे डोंगराई सर्कल येथे येणार आहेत. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक राम गोमारे गुन्हे शोध पथक इंदापूर.व त्यांचे सहकारी यांनी सापळा रचून शिताफीने दोन आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्हयातील १४० लीटर डीझेल व वापरलेली पांढ-या रंगाची स्कार्पिओ गाडी असा एकूण २ लाख ९ हजार ९०० रु. चा मुददेमाल जप्त केला आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’201a0769-c193-11e8-9579-afe55b3d1a00′]

या गुन्हयात आरोपी १) शाकीर अजीज खान रा. मकसद गडाली ता शाजापूर जि शाजापूर राज्य मध्यप्रदेश २) शहाबाज कल्लू खान रा. मकसीद गडोली ता शाजापूर जि. शाजापूर राज्य मध्यप्रदेश यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांना इंदापूर न्यायालयाने दि.२८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सदरची कारवाई ही  बारामती पोलिस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, इंदापूर पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम गोमारे, पोलीस हवालदार शिरीष लोंढे, मड्डी, महेश माने, पोलीस कॉन्स्टेबल बापू मोहीते, जगदीश चौधर, अमित चव्हाण, राहूल बडे, सुशांत तारळेकर यांचे पथकाने केली.पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक राम गोमारे हे करत आहेत.