पोलिसांनी घरफोड्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

इंदापूर : पाेलीसनामा ऑनलाईन

सुधाकर बोराटे

इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका,बिजवडी कारखाना परिसर,अकलुज बायपास ( हायवे ), इरिगेशन काॅलनी, पाटील बंगला या भागात दिवसा व रात्री घरफोड्या, चोर्‍या करणार्‍या टोळीचा छडा लावण्यात इंदापूर पोलिसांना यश आले असुन, त्यांना ताब्यात घेवुन ८५ हजार ३२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आल्याने इंदापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f13af6a-c018-11e8-b562-4bca7ba417b7′]

इंदापूर शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासुन घरफोड्या व चोर्‍यांचे प्रमाण वाढले होते. त्यातच पोलिस अधिक्षक पूणे (ग्रामिण), अप्पर पोलिस अधिक्षक बारामती विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती, यांनी मालमत्ता विरूद्धच्या गुन्ह्याची तसेच विभागातील गंभिर स्वरूपाच्या गुन्ह्याची माहीती घेवून गुन्हे उघडकिस आणण्यासाठी वारंवार सुचना व आदेश दीले होते.

इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मधूकर पवार, व पोलिस उपनिरिक्षक गोमारे यांना मिळालेल्या माहीती नुसार पोलीस स्टापसह इंदापूर येथिल अकलुज रोड, म्हसोबाचा माळ येथे सापळा रचुन नितिन ज्ञानदेव घनवट वय ३४ वर्षे. रा. आठभाई मळा इंदापूर. याला ताब्यात घेवुन चौकशी केली असता इंदापूर शहर व परिसरात पाच ठीकाणी घरफोडी चोर्‍या केल्याची कबुली त्याने दिली.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’95e5e6d8-c018-11e8-94ec-af4425ebb3e0′]

त्याला विश्वासात घेवून पोलासांनी अधिक चौकशी केली असता त्याचे सोबत आणखी तीन साथीदार असल्याचे त्यांने सांगीतले. २)आंबादास धनाजी ढावरे.वय २१ वर्षे रा.साठेनगर, इंदापूर,३) संजय उमाजी चव्हाण.वय. १९,वर्षे,रा.रामोशी गल्ली इंदापूर., ४) विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी सर्वांनी मिळुन पाच घरफोड्या केल्याचे कबुल केले.

पाच गुन्ह्यातील रोख रक्कम, लेनोओ कंपनिचा लॅपटाॅप, वाहनांचा जाॅक, मोटार सायकलच्या ट्युब, कटर मशिन, काँम्प्रेसर, कपडे, साड्या,गॅस शेगडी, फॅन,तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण ८५ हजार ३२ रूपयांचा मुद्दे माल पोलिसांनी हस्तगत केला असुन त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहीती पोलिस निरिक्षक मधूकर पवार यांनी दिली.
[amazon_link asins=’B07B8HZ4K7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9bfbd265-c018-11e8-87f9-c348c12bb631′]

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक पूणे ( ग्रामीण संदिप पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक, बारामती विभाग संदिप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती उपविभाग नारायण शिरगावकर यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस निरिक्षक मधूकर पवार, राम गोमारे.पो. उप निरिक्षक, पो. ह.एस.एम. वाघमारे,पो. काॅ.बी.एम. मोहीते, अमित चव्हाण, जी.एस.चौधर, आर.डी. बडे यांनी करून चार आरोपींच्या मुस्क्या आवळल्या.पुढील तपास पोलिस निरिक्षक मधूकर पवार हे करत आहेत.

गुन्हे शाखेत दोन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या