इंदापूर येथील कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर शहरातील (कुरेशी गल्ली) येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या जणावरांच्या कत्तलखाण्यावर बारामती गुन्हे अन्वेशन शाखा व इंदापूर पोलीस पथकाने संयुक्तरित्या छापा टाकुन 3 हजार 300 कीलो गोमांस,१०३ जीवंत जणावरे,सहा वाहनांसह 14 लाख 90 हजाराच्या मुद्देमालासह 18 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.तर एक अल्पवयीनसह तीघांना  पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्यापैकी दोघांना इंदापूर कोर्टात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दीले असल्याची माहीती इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे यांनी दीली.

कलीम कयुम कुरेशी.रा.कुरेशी गल्ली इंदापूर, पूणे,वाहीद शब्बीर कुरेशी.(वय39) रा.समतानगर अकलुज,ता.माळशिरस,जि.सोलापूर,व आश्कन नयुम कुरेशी (वय15) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असुन यापैकी कलीम कुरेशी व वाहीद कुरेशी यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दीले आहेत.तर रशीद बेपारी रा.करेशी गल्ली इंदापूर,जमीर बेपारी.रा.कुरेशी गल्ली,इंदापूर,कासम कुरेशी.रा.पानगल्ली, बारामती,जमीर कुरेशी रा.बारामती,समीर शब्बीर सोदागर.रा.पंचशिलनगर अकलुज,जि.सोलापूर,पीकअप न.एम.एच42, एम. 6759 चालक व मालक नाव पत्ता माहीत नाही,आयशर टॅम्पो न.एम.एच.42, बी 7527 चे चालक व मालक नाव पत्ता माहीत नाही,पीकअप न.एम.एच.13,सी.यु 2014 चे चालक व मालक नाव पत्ता माहीत नाही,पीकअप न. एम.एच.42, एम.6409 चे चालक व मालक नाव पत्ता माहीत नाही,आयशर टॅम्पो न. एम.एच.11,ए.एल.2408 चे चालक मालक नाव पत्ता माहीत नाही. अशा एकुण 18 जणांवर गुन्हा इंदापूर पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारीत 1995 कलम 5(अ)(ब)(क) व पशु क्रुरता अधिनियम 1960  कलम 11 चे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर इंदापूर (गुरेशी गल्ली) येथे अवैधरित्या कत्तलखाना सुरू असल्याची माहीती गूप्त खबर्‍या मार्फत गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली त्यांच्या आदेशानुसार बारामती विभागीय गुन्हे अन्वेषण विभाग व इंदापूर पोलीस यांनी 3 जून रोजी रात्री अकरा वाजता छापा टाकला. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहने गोमांस, आणि जिवंत जनावरे असल्याचे दिसून आले.सदर मुद्देमाल जप्तीची कारवाई सुरू असताना सदर ठिकाणी आरोपी हे अवैधरित्या गोवंशाची कत्तल करत असताना दिसून आले. या ठिकाणाहून तीन आयशर मोठे टेम्पो तीन पिकअप अशी सहा वाहने ताब्यात घेतली. त्याठिकाणी 98 जिवंत गोवंश जनावरे, तीन देशी गाई, एक जर्सी बैल, एक म्हैस, अशी एकूण 103 जनावरे ताब्यात घेण्यात आली. याठिकाणी 3300 किलो कापलेले मांस मिळून आले असा एकूण 14 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल व वाहने जप्त करण्यात आली.

सदर कामगिरीमध्ये पुणे ग्रामीण चे पोलीस धीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या आदेशान्वये बारामती गून्हे अन्वेशनचेपोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, इंदापूर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे, इंदापूर पो.स्टे. सहा.पोलीस निरिक्षक गणेश लोकरे, सहा.पो.नि.बीरप्पा लातुरे,महेश विधाते, इंदापूर सुरेंद्र वाघ, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, चालक भाऊसाहेब मोरे, मंगेश कांबळे, अमोल नरुटे, पांडुरंग बागल, नाथा जगताप, अविनाश दराडे, तुषार चव्हाण, आमन शेख, जगदीश चौधर, गणेश झरेकर, अमोल गार्डि, विनोद मोरे, विक्रम जाधव, वैभव मदने, गोकुळ हिप्परकर, काका पाटोळे, विक्रम जमादार आदी पोलीस कर्मचारी यांचे पथकाने ही कारवाई करून मूद्देमाल जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढुल तपास सहा. पोलीस निरिक्षक गणेश लोकरे हे करत आहेत.