इंदापूरचा निकाल अनपेक्षित : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल हा अतिशय अनपेक्षित असा आहे. या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल हा मान्य आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (गुरुवारी) दिली.

इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत 1 लाख 11 हजार 850 मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखविला आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा 17 हजार 623 मते अधिक मिळालेली आहेत.तरीही निवडणुकीत अल्प मतांच्या फरकाने हार स्वीकारावी लागत आहे.गेली पाच वर्षे इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न आम्ही प्रभावीपणे मांडला तसेच पाच वर्षे सतत परिश्रम करूनही विजय मिळाला नाही, याची जरूर खंत वाटत आहे. निवडणुकांमध्ये मतदार हे मतदान करताना इतर घटकांचाही विचार करतात हे लोकशाहीमध्ये चांगले नसल्याचे मतही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.तसेच निवडणूकीत हार-जीत होत असते,असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता राज्यात भाजप व महायुतीचे सरकार सत्तेवर येत आहे.या परिस्थितीत इंदापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा विजय हा सर्वांनाच अपेक्षित होता,मात्र सर्वांनाच धक्कादायक असा निकाल लागलेला आहे,असे त्यांनी सांगितले.यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी भाजप-महायुतीवर व माझेवर विश्वास ठेवून मतदान केलेबद्दल सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले.

Visit : Policenama.com