Coronavirus : इंदापूरमध्ये 4 तर तालुक्यात एकूण 14 नवे कोरोना पॉझिटिव्ह

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे )-   इंदापूर तालुक्यात बुधवारी 15 जुलै रोजी एकुण 15 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.त्यांच्या संपर्कात आलेल्या 61 संशयीतांचे स्वॅबचे नमुने गुरूवारी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाकडून इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात घेण्यात आले होते.सदर स्वॅबचे नमुणे टेस्ट तपासणीसाठी पूणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. सदरचा तपासणी अहवाल आज शुक्रवार दि. 17 रोजी वैद्यकीय विभागाला प्राप्त झाला असुन 61 पैकी 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले असल्याची माहीती इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दीली आहे.

बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या 15 जणांच्या संपर्कातील 61 संशयीतांचे स्वॅब नमुणे तपासणीसाठी पूणे प्रयोगशाळेकडे पाठविले होते.त्यापैकी 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असुन 47 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. इंदापूर तालुक्यात अकोले 1, निमगाव केतकी3, इंदापूर 4, वरकुटे 5 आणी कळंब 1 असे एकुण 14 रूग्ण पॉझिटिव्ह आले असुन तालुक्यात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे. पॉझिटिव्ह आकड्याची शंभरीकडे वाटचाल सुरु असल्याने तालुक्यात कोरोनाची दहशत पसरली असुन इंदापूर तालुका पूणे जिल्ह्यात हाॅटस्पाॅटच्या दीशेने वाटचाल करत असल्याचे चीत्र असुन पाॅझीटीव्ह रूग्ण सापडलेल्या गावातील लगतचा भाग खबरदारीचा उपाय म्हणून संबधीत प्रशासनाकडून सील करण्याची कार्यवाही सुरू असुन नागरीकांनी नियमांचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना महामारीचा उद्रेक इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील कोरोना रूग्णांचा वाढता आलेख हा नागरीकांना आरोग्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे आनेकांनी मत व्यक्त केले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे इंदापूर तालुक्यातील नागरीक घरातुन बाहेर पडण्यास घाबरत असुन तालुक्यातील मुख्य रस्ते, गावा- गावातील अंतर्गत रस्ते व वाड्यावस्त्या दिवसा निर्मणुष्य दीसुन येत असल्याने तालुक्यात भयाण शांतता पसरल्याचे चित्र आहे.तर तालुक्याच्या मुख्य बाजारपेठा ग्राहकाविना ओस पडल्याने सर्वत्र शुकशुकाट असुन तालुक्यातील लहाणापासुन जेष्ठापर्यंत, गरीबापासुन श्रीमंतापर्यंत व युवावर्गही कोरोनाच्या दहशतीखाली वावरत असुन संपूर्ण तालुक्यात कोरोनाच्या भीतीने स्मशान शांतता पसरल्याचे चित्र आहे. नागरीकांनी न घाबरता योग्य ती खबरदारी घेवुन नियमांचे काटेकोरपणे पालण करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी केले आहे.