लोणीदेवकर आनंद टेक्नोतील अडीच लाखाच्या मालावर चोरट्यांचा डल्ला

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) –   लोणी देवकर (ता.इंदापूर) येथील एम आय डीसी आनंद टेक्नो एडस इंजिनिअरींग इंडिया कंपनीतील स्टोअर रूमचे कुलुप तोडून २ लाख ४७ हजार ५०० रूपये किमतीचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असुन याबाबतची फिर्याद कंपनीच्या वतीने हरीदास रामचंद्र ठोंबरे (वय 34) मुळ रा. निंबोरे, ता.फलटण, जि.सातारा व सध्या रा.आनंद टेक्नो एडस इंजिनिअरींग इंडिया कंपनी गेस्ट हाउस, लोणी देवकर एमआयडीसी,ता.इंदापूर, जि.पूणे. यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक २६ जून २०२० रोजी रात्रीचे ११ ते दिनांक २७ रोजी सकाळी ११ वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने मौजे लोणी देवकर एमआयडीसी मधील आनंद टेक्नो एडस इंजिनिअरींग इंडिया कंपनी मधील गॅल्बानाईजींग शाॅप स्टोअर रूमचे कुलुप कशाचेतरी सहाय्याने दगडाने किंवा हातोड्याने ठोकुन तोडून आतमध्ये प्रवेश करून इगनोट या नावाचे प्रत्येकी २५ कि वजनाचे ४४ पार्ट, २ लाख ४७ हजार ५०० रूपये किमतीचा माल चोरून नेल्याचे फीर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशील लोंढे हे करत आहेत.