इंदापूर : वडापुरीत शेततळ्यात बुडुन दोन भावंडाचा मृत्यु

इंदापूर : वडापुरी (ता. इंदापूर ) येथील किशोर शिर्के कुटुंबातील दोन चिमूरड्या भावंडाचा शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृृृत्यु झाल्याची घटना गुरूवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी दुपारी घडली असुन या घटनेमुळे शिर्के कुटुंबावर ऐन बैल पोळा सणाच्या दिवशीच दुखा:चा डोंगर कोसळला असुन या घटनेमुळे संपूर्ण वडापुरी गावावर शोककळा पसरली असुन परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे..

अविष्कार उर्फ देव किशोर शिर्के (वय ९ ) व अधिराज उर्फ ध्रुव किशोर शिर्के (वय ७) असे मत दोन सख्ख्या भावावंडाची नावे असुन गुरूवार दिनिंक १७ रोजी दुपारी एकच्या सुमारास अविष्कार,अधिराज व त्यांचा चुलतभाऊ नाथ हे तिघे नेहमीप्रमाणे शेतात खेळायला गेले होते. खेळता खेळता ते शेततळ्याकडे गेले. याच दरम्यान अविष्कार व अधिराज सख्खे भाऊ हे पाय घसरून शेततळ्यातील पाण्यात पडले. वयाने दोघेही लहाण असल्याने त्यांना पोहता येत नव्हते. त्यामुळे ते पाण्यात बुडाले.

सदरची घटना त्यांचे सोबत असलेला चुलत भाऊ नाथ प्रल्हाद शिर्के (वय ९) याने पाहीली व घाबरलेल्या अवस्थेत घरी येवुन घरच्यांना घटनेची माहीती दीली. त्यानंतर सर्व कुटुंबीयांनी शेततळ्यकडे धाव घेतली व मुलांना पाण्यातून बाहेर काढून तात्काळ पुढील उपचासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णांलयात उपचारासाठी दाखल केले.वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून दोघेही मृृत झाल्याचे घोषीत केले..

शिर्के कुटुंबीयावर बैल पोळा सणादिवशीच काळाचा घाला.

मौजे वडापुरी येथील प्रगतशिल बागायतदार किशोर शिर्के व शितल शिर्के या दांमत्यास दोनच मुले होती. मात्र बैलपोळा सणा दिवशीच काळाने घाला घातला. सदरची घटना वडापुरी गावात व परिसरात वार्‍यासारखी पसरल्याने संपूर्ण वडापुरी गाव,आजुबाजुच्या वाड्या वस्त्या व परिसरात ऐन बैल पोळा सणादिवशीच शोककळा पसरली. हृदय हेलावून टाकणारी घटना घडल्याने वडापुरी गावावर शोककळा पसरली असुन सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like