Advt.

इंदापूरात 23 वर्षीय युवकाची गळफास घेवुन आत्महत्या

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर शहरातील पाटील बंगला येथील उच्चभ्रु वस्तीत राहणार्‍या एका 23 वर्षीय युवकाने राहत्या घरात शर्टाच्या सहाय्याने पख्यांला बांधुन गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि.11 जुलै रोजी इंदापूर शहरात घडली असुन याबाबतची माहीती मयत युवकाचा चुलतभाऊ निमेश जितेंद्र सोनी रा. सिद्धेश्वर मंदीर शेजारी मेनरोड, इंदापूर,जि.पूणे याने इंदापुर पोलीस ठाण्यात दीली आहे.

प्रतिक सुरेश सोनि (वय 23) मुळ रा. सिद्धेश्वर मंदीरशेजारी मेनरोड इंदापूर व सध्या रा.पाटील बंगला, सोनाईनगर इंदापूर जि.पूणे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तर मयत प्रतिकचा चुलत भाऊ याने पोलीसांना दीलेल्या माहीतीत म्हटले आहे की शनिवारी सकाळी सात वाजणेच्या पुर्वी (नक्की वेळ माहीत नाही) त्याचा चुलत भाऊ प्रतिक याने पाटील बंगला येथील राहते घरात छताच्या पंख्याला शर्टच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.

घटनेची खबर मिळताच इंदापूर पोलीसांनी घटनास्थळी रवाना होउन घडलेल्या घटनेचा पंचनामा केला व मयत बाॅडी उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णांलय इंदापूर येथे दाखल करण्यात आले. डाॅक्टर तपासणीत गळफास घेउन आत्महत्या केल्याचे कारण स्पष्ट झाले असुन मयताच्या अंगावर इतरत्र कसलीही जखम अथवा खुना आढळुन आल्या नसल्याचे डाॅक्टरांनी सांगीतले. परंतु प्रतिक सोनी याचे आत्महत्येचे नेमके कारण काय ते अद्याप स्पष्ट झाले नसुन पुढील तपास पो.ना.बापु मोहिते हे करत आहेत.