इंदापूरचा पुढील आमदार भाजपचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी भिगवणनमध्ये उपस्थित असलेला नागरिकांचा जनसागर ही तर हर्षवर्धन पाटलांच्या आगामी विजयाची नांदी आहे. इंदापूरच्या जागेचा निकाल आजच लागला असुन हर्षवर्धन पाटील तुम्ही इंदापूरच्या जागेची काळजी करू नका, आगामी विधानसभेचा आमदार भाजपचाच निवडून येणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी भिगवण येथे बोलताना व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची महाजनादेश यात्रा भिगवण येथिल मदनवाडी चौक येथे आली असता उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणविस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निरा नरसिंहपूर येथिल लक्ष्मी नरसिंह मुर्तीचा फोटो देवुन हर्षवर्धन पाटील यांनी महाजनादेश यात्रेचे स्वागत केले. यावेळी पूणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, खासदार अमर साबळे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने राज्यातील गोरगरीब, दीनदलीत, अल्यसंख्यांक, धनगरसमाज, शेतमजुर ,ओबीसी,मराठा समाज बांधव,अशा सर्व समाजबांधवांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे काम केले आहे. पाच वर्षात भाजप सरकारने जे काम केले आहे तेच काम पूर्विच्या सरकारला १५ वर्षे सत्ता असताना करता आलेल नाही.शेतकर्‍यांच्या पाठीशी भाजप सरकार ठामपणे उभे राहीले असुन पाच वर्षात शेतकर्‍यांच्या खात्यात ५० हजार कोटी रूपये जमा केले असल्याचे ते म्हणाले.

राज्यात बंद पडलेल्या सिंचनाच्या योजना सुरू केल्या असुन आज हर्षवर्धन पाटलांनी इंदापूर तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरण्याची मागणी केली आहे.तालुक्यातील सर्व तलाव भरण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गीरिष महाजन यांना अत्ताच सर्वांच्या साक्षीने देत असल्याचे सांगीतले. ते म्हणाले की हर्षवर्धन पाटलांसारखा एक अणूभवी व प्रभावी नेता अत्ता आमच्यासोबत आहे.तर लोकांनी त्यांच्या कामांविषयी कळजी करण्याचे कारण नाही.इंदापूरकरांकडून मागणी करण्यात आलेली उजणी उचल पाण्याची योजना तात्काळ मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दीले.ते पुढे म्हणाले की महाजनादेश यात्रा हीत तर नांदी आहे.आपले प्रेम पाहुन इंदापूरचा निकाल आजच लागला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी तालुक्याती हजारो कार्यकर्ते महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित होते.भाजपा तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, अ‍ॅड.कृृृृष्णाजी यादव, शिवाजीराव भुजबळ, बाबासाहेब चौरे, पांडूरंग (तात्या) शिंदे,मारूती वणवे,वसंत मोहोळकर,पिंटु काळे, मयुरसिंह पाटील, भरत शहा, कैलास कदम,तानाजी थोरात,लालासाहेब पवार,कांतीलाल झगडे,देवराज जाधव,इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

 

आरोग्यविषयक वृत्त –