PM मोदींकडून ‘प्लास्टिक मुक्ती’चे आवाहन, 2 ऑक्टोबरला उचलणार महत्वपूर्ण ‘पाऊल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात आज मोठ्या उस्ताहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. आज दिल्ली पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात आल्यानंतर मोदींनी देशातील जनतेला संबोधित केले. मोदी सरकारने सुरु केलेल्या स्वच्छता अभियानानंतर आता त्याचेच पुढेचे पाऊल म्हणून देशाला ‘प्लास्टिक मुक्ती’साठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशाला आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला प्लास्टिक मुक्तीचे आवाहन केले आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, देशात प्लास्टिक मुक्तीसाठी अभियान सुरु करण्याची आवश्यकता आहे. देशातील दुकानदारांना देखील मोदींनी आवाहन केले आहे की, सर्व दुकानदारांनी दुकानाबाहेर प्लास्टिकची पिशवी देण्यात येणार नाही अशी सूचना लावावी. मेड इन इंडिया वस्तूंना आपण प्राधान्य दिले पाहिजे.  

 
देशाला प्लास्टिक पासून मुक्त करण्यासाठी मोदी सरकार पाऊल उचलणार आहे. यावर लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींनी देशातील जनतेला प्रश्न विचारला की, आपण देशातील प्लास्टिकच्या वापरापासून सूटका करुन घेऊ इच्छितो? आता वेळ आली आहे की, याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची. यासंबंधित २ ऑक्टोबरला आपण महत्वाचे पाऊल उचलणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like