आता ‘चीफ डिफेन्स ऑफ सिक्युरिटी’ हे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, स्वातंत्र्यदिनी PM नरेंद्र मोदींची लाल किल्ल्यावरून घोषणा

पोलीसनामा ऑनलाईन – आज देशभरात ७३ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मागील आठवड्यात केंद्र सराकारने घेतलेल्या जम्मू काश्मीर संबंधित ३७० कलम रद्द करण्याचा घोषणेनंंतर आता देशाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने ‘चीफ डिफेन्स ऑफ सिक्युरिटी’ (CDS) हे पद निर्माण केले आहे. लाल किल्ल्यावरुन भाषण देताना पंतप्रधान मोदींनी ही महत्वपूर्ण घोषणा केली आहे.



मोदी सरकारने चीफ डिफेन्स सिक्युरिटी या पदाची घोषणा केल्याने आता हे पद भूषणारे अधिकारी देशाच्या तिन्ही सैना दलाचे नेतृत्व करतील. तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुख पदी ही प्रभारी व्यक्ती असेल. मोदी सरकारच्या या घोषणेने भारताच्या इतिहासात हे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले आहे. तिन्ही सैना दलात ताळमेळ राखण्याची भूमिका या पदावरील व्यक्ती निभावेल. पंतप्रधान मोदींनी भाषणा दरम्यान सांगितले की, आता यापुढे तिन्ही दलाच्या सैन्याला एक साथ चालावे लागेल. 
 
दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढा-  
आम्ही महागाई नियंत्रणात आणली, तसेच विकास दर देखील स्थिर ठेवला आहे. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढा देत आहोत. संपत्ती निर्मिती देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. शिवाय संपत्ती निर्मिती करणारे देखील या देशाची संपत्ती आहेत असे देखील पंतप्रधान मोदींनी लाल किल्यावरील आपल्या भाषणात सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –