‘छोटे कुटूंब ही देशभक्ती’, लोकसंख्येच्या विस्फोटावर मोदींचा प्रहार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी भाषण देताना अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. आज सकाळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन पार पडले. यावेळी त्यांनी देशवासियांना संबोधित करताना देशातील काही राज्यात आलेल्या महापूरावर तसेच वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करत लक्ष वेधले. छोटे कुटूंब म्हणजे देशभक्ती असा संदेश पंतप्रधान मोदींकडून देण्यात आला आहे.

लोकसंख्येचा विस्फोट होत असल्याचे सांगताना ते म्हणाले की, देशात लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे.  परंतू लोक या विषयावर पाऊल ठेवून विचार करत आहेत आणि छोट्या कुटूंबचा फायदा घेत आहेत, त्यांना आज सन्मानित करण्याची गरज आहे. छोटे कुटूंब म्हणजे एक प्रकारे देशभक्तीच आहे. मुलाला जन्म देण्याआधी विचार करायला हवा की काय आपण यासाठी तयार आहे, मुलांच्या गरजा पूर्ण करण्यास आपण तयार आहाेत. मोदी पुढे यावर म्हणाले की, छोट्या कुंटूंबामुळे देशाच्या विकासाला गती मिळत आहे.

 

राज्यातील पूरपरिस्थिती बाबत संवेदना व्यक्त –

आज एकीकडे देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत आणि दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

 जल जीवन मिशन –
देशातील प्रत्येक घरात पिण्याचे स्वच्छ पाणी आवश्यक आहे. पाणी वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. जल जीवन मिशन घेऊन सरकार काम करत आहे. जलसिंचन, जल संचय वाढवण्यावर सरकारचा भर आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून जल जीवन मिशनवर ३.५ लाख कोटी रूपये खर्च करणार असल्याचे देखील मोदींनी यावेळी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like