PM मोदी उद्या लाल किल्ल्यावरून 7 व्यांदा करतील संबोधित, जाणून घ्या यापुर्वी 6 वेळा केलेल्या मोठ्या घोषणा

नवी दिल्ली : 74व्या स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला 7 व्यांदा संबोधित करणार आहेत. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सर्वांचे लक्ष पीएमच्या भाषणाकडे लागले आहे. चीनसोबतचा वाद आणि त्यामध्ये शहीद झालेले 20 जवान, कोरोनाचे संकट अशा स्थितीत आत्मनिर्भर भारत अंतर्गत काही भावी योजनांसोबत नवीन मीशन समोर येऊ शकते. कारण पंतप्रधानांनी यापूर्वीच्या भाषणांमध्ये लक्षवेधक उपक्रमांची घोषणा केलेली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान जन धन योजना, स्वच्छ भारत, पंतप्रधान जन आरोग्य अभियान, योजना आयोगाचे पंतप्रधान जन आरोग्य अभियान, योजना आयोग रद्द करणे आणि संरक्षण कर्मचार्‍यांच्या प्रमुख पदांची घोषणा, इत्यादीचा समावेश आहे.

या उपक्रमांसह पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केंद्र सरकारने केलेल्या कामांचा देखील प्रत्येकवेळी उल्लेख केला आहे. मात्र, यावर्षी हा उत्सव कोविड-19मुळे थोडा कमी रंगतदार वाटणार आहे. स्वातंत्र्याच्या उद्याच्या जल्लोषापूर्वी एक नजर टाकूयात पंतप्रधान मोदी यांनी मागील संबोधानात केलेल्या घोषणांवर…

2014 : जनतेला देशाच्या मुळांशी जोडण्याचा प्रयत्न

15 ऑगस्ट 2014 ला नवी दिल्लीमध्ये 68व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करताना पीएम मोदी यांनी बलात्काराच्या एका प्रकरणावर टीका केली आणि 15 ऑगस्टला धार्मिक हिंसा बंद करण्याचे आवाहन केले.

1. या व्यासपीठावरून त्यांनी मेक इन इंडिया उपक्रमाची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, याद्वारे भारतात कौशल्य, प्रतिभा आणि कायदा याचे प्रदर्शन करायचे आहे.

2. गरीब नागरिकांना बँक खात्याच्या सुविधेशी जोडण्यासाठी पंतप्रधान जन-धन योजनेची घोषणा केली.

3. 2 ऑक्टोबर 2014 पासून ’स्वच्छ भारत’ अभियानाची घोषणा.

4. त्यांनी म्हटले की, डिजिटल इंडिया राष्ट्र आणि गरीबांसाठी एक स्वप्न आहे. जर आपण इलेक्ट्रॉनिक डिजिटल इंडियाच्या स्वप्नासोबत निघालो आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार केल्या आणि आत्मनिर्भर झालो, तर ही देशासाठी मोठी संधी असेल.

5. खासदार आदर्श ग्राम योजना, ज्याअंतर्गत खासदारांनी 2016 पर्यंत आपल्या मतदार संघातील गावाला आदर्श गाव बनवण्याची घोषणा केली.

6. त्यांना घोषणा केली की, देशातील सर्व शाळांमध्ये एक वर्षांच्या आत मुलींसाठी वेगळे शौचालय निर्माण झाले पाहिजे.

7. योजना आयोगाऐवजी एक नवीन संस्था असेल.

2015 : काळापैसा शोधून काढणे आणि उद्योगांना प्रोत्साहन

1. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्ट-अप इंडिया उपक्रमाची घोषणा.

2. त्यांनी म्हटले की, सरकारचे लक्ष्य पुढील 100 दिवसांच्या आत सर्व वीज नसलेल्या 18,500 गावांमध्ये वीज पोहचवणे.

3. ’सी’ आणि ’डी’ श्रेणीच्या सरकारी नोकर्‍यांसाठी भरती मुलाखतीसोबत करण्याची घोषणा.

4. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान जन धन योजनेच्या माध्यमातून 17 कोटी बँक खाती उघडण्यासह आर्थिक अंतर्भावाला प्रोत्साहन मिळाले.

5. काळ्यापैशावर अंकुश लावण्यासाठी केलेल्या कामांची माहिती दिली आणि भ्रष्ट अधिकार्‍यांविरोधात केलेल्या कारवाईची.

6. कृषी मंत्रालयाचे नाव बदलून कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय करण्याची घोषणा.

7. ओआरओपीच्या मागणीस तत्वता मान्यतेची घोषणा केली.

2016 : रचनात्मक सुधारणा करणे आणि अप्रचलित कायदे रद्द करणे.

1. लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित करताना मोदींनी म्हटले, 2 कोटीपेक्षा जास्त शौचालये बनवली आहेत.

2. 21 कोटी लोकांना पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत जोडण्यात आले आहे.

3. पीएमने म्हटले की, सरकारने जवळपास 1700 अप्रचलित कायदे बाजूला केले आणि ससंदेने त्यापैकी सुमारे 1,175 रद्द केले आहेत.

4. ते म्हणाले की, मागील काही दिवसात पाकव्याप्त काश्मीरमधून बलूचिस्तान, गिलगिटच्या लोकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत, हा भारताच्या 1.25 बिलियन लोकांचा सन्मान आहे. मी बलूचिस्तान, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांचा अभारी आहे.

5. त्यांनी शेजार्‍यांना गरीबीशी लढण्याचे आवाहन केले. मी आपल्या शेजार्‍यांना सांगतो की, चला गरीबीशी लढा, आपल्या लोकांशी लढून आपण स्वताला नष्ट करू, केवळ गरीबीशी लढून आपण समृद्ध होऊ.

6. स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या पेन्शनमध्ये 20 टक्केच्या वाढीची घोषणा.

7. पीएम मोदी म्हणाले, वीज नसलेल्या 18,000 गावांपैकी 10,000 गावांना वीज पुरवण्यात आली.

भारतातील तरूणांना डिजिटल इंडियासाठी प्रोत्साहन दिले.

2017 : डिजिटल इंडियाला प्रोत्साहन

1. पीएम मोदी यांनी म्हटले की, आपल्याला ’चलता है’ भूमिका सोडावी लागेल आणि ’बदल सकता है’ च्या बाबत विचार केला पाहिजे. ही भूमिका आपल्याला राष्ट्रासाठी उपयोगी पडणार आहे.

2. 14,000 पेक्षा जास्त गावे, जी स्वातंत्र्यानंतरही अंधारात होती त्यांना वीज पोहचवली.

3. त्यांनी म्हटले की, दोन कोटीपेक्षा जास्त गरीब माता आणि बहिणी आता लाकडांचा वापर करत नाहीत, त्या आता एलपीजी गॅस स्टोव्हचा वापर करत आहेत.

4. एक वेबसाइट सुरू करण्याची घोषणा जी वीर पुरस्कार विजेत्यांच्या पराक्रमाची माहिती देईल.

5. त्यांनी म्हटले की, 1942मध्ये राष्ट्राचे आव्हान भारत छोडो होते आणि आजचा नारा भारत जोडो (युनाइट इंडिया) आहे.

6. नागरिकांना डिजिटल व्यवहार करणे आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वळण्याचे आवाहन.

7. पीएमने म्हटले की, सरकारने 1.25 लाख कोटी रूपयांचा काळापैसा जप्त केला आहे.

8. त्यांनी म्हटले की, काश्मीरचे प्रकरण गाली, गोलियां किंवा सर्व काश्मीरींची गळाभेट घेऊन सुटणार नाही.

9. त्यांनी म्हटले, हवाला व्यवहार करणार्‍या 3 लाख शेल कंपन्यांमधून 1.75 लाख कंपन्यांची नोंदणी रद्द केली आहे.

2018 : अंतराळात अनेक उड्डाणांची घोषणा. महत्वाच्या योजनांचा उल्लेख केला.

1. एका भारतीयाला 2022 पर्यंत मानवयुक्त अंतराळ मिशनच्या एका भागाच्या रूपात अंतराळात पाठवण्याची घोषणा.

2. तेरा कोटी मुद्रा कर्ज प्रदान करण्यात आली. ज्यामध्ये चार कोटी युवक सुद्धा सहभागी आहेत, ज्यांनी पहिल्यांदा आत्मनिर्भर बनण्याच्या आशेने कर्ज घेतले आहे.

3. गरीब लोकांना गंभीर आजारांवर मोफत उपचारासाठी पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू करण्याची घोषणा.

4. भारतीय सशस्त्र दलांच्या लघुसेवा आयोगात महिला अधिकार्‍यांच्या नियुक्तीसाठी स्थायी आयोगाच्या अनुदानाची घोषणा.

5. त्यांनी म्हटले की, अनेक पिकांचे किमान समर्थन मूल्य इनपुट खर्चाच्या दिडपट वाढवण्यात आले आहे.

6. त्यांनी म्हटले की, देश विक्रमी अन्नधान्याचे उत्पादन करत आहे आणि मोबाइल फोन विक्रमी संख्येने बनवत आहे. ट्रॅक्टर्सची विक्री एका नव्या उंचीवर आहे. देश स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त विमाने खरेदी करत आहे.

7. त्यांनी म्हटले की, देशाला स्वदेशी भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (आयआरएनएसएस) एनएव्हीएलसी लाँच करण्याचा विश्वास आहे, जे सॅटेलाइट सिग्नलद्वारे मच्छिमार आणि अन्य नागरिकांना मार्गदर्शन करेल.

2019 : इन्फ्रास्ट्रक्चर अँड एनव्हार्नमेंटलला प्रोत्साहन

1. त्यांनी म्हटले की, कलम 370 आणि 35 ए रद्द करणे सरदार वल्लभ भाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाकलेले महत्वाचे पाऊल आहे आणि म्हटले की, वन नेशन, वन संविधान ची भावना एक वास्तव बनले आहे.

2. ’जल-जीवन’ मिशनला चालना देण्याची घोषणा. त्यांनी या मिशनवर 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत पिण्यायोग्य पाणी पोहचवण्यासाठी 3.5 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च करण्याचे आश्वासन दिले.

3. सामान्यांच्या जीवनावरील ओझे कमी करण्यासाठी सुमारे 1,450 अप्रचलित कायदे रद्द केले.

4. देशात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या योजनेची घोषणा केली.

5. त्यांनी म्हटले की, हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असायला हवे की, देश पुढील पाच वर्षात 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात येईल.

6. उच्च संरक्षण व्यवस्थेत प्रमुख सुधारणा म्हणून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) पदाच्या निर्मितीची घोषणा केली.

7. भारत पुढील काही आठवड्यात उघड्यावर शौचमुक्त घोषित करणार.

8. महात्मा गांधींच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नानुसार पीएम मोदी यांनी नागरिकांना स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले.

9. भारताला सिंगल यूज प्लास्टिकपासून मुक्त बनवण्याची घोषणा.