गडचिरोली : माओवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – गडचिरोलीच्या कोठी गावात शुक्रवारी सकाळी माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गडचिरोलीतील कोठी गावात दुकानात सामान खरेदी करता गेलेल्या जवानांवर माओवाद्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये दुशंत नंदेश्वर जवान शहीद झाला. तर दिनेश भोसले जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर जवळील नौगाम येथे पोलिस पथकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यामध्ये दोन पोलिस शहीद झाले आहेत. तर एक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराची घेराबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

दहशतवाद्यांनी नौगाम येथे १५ ऑगस्टच्या निमित्ताने सुरक्षेसाठी तैनात पोलिस पथकावर हल्ला केला. श्रीनगर जवळील नौगाम येथे आज शुक्रवारी सकाळी हा हल्ला घडवून आणण्यात आला. जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान दोन पोलिस शहीद झाले. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी दहशतवादी हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. ज्या भागात हल्ला झाले आहे तेथे सर्च ऑपरेशन सुरु आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like