Independence Day 2021 | ‘हे स्वातंत्र्य खोटे आहे’ म्हणणार्‍या डाव्या पक्षांनी पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात फडकवला तिरंगा

नवी दिल्ली : Independence Day 2021 | 75 व्या स्वातंत्र्य दिनासह (75 Independence Day) देशातील डावे पक्ष (Left Parties) सीपीआय (एम) (CPI-M) चा इतिहास बदलला आहे. यापूर्वी ‘हे स्वातंत्र्य खोटे आहे’ म्हणणार्‍या डाव्या पक्षांनी रविवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त पहिल्यांदा पक्ष कार्यालयात (Party Office) तिरंगा फडकवला आणि स्वातंत्र्य दिवस साजरा केला.

दिल्ली, कोलकातासह बंगालमध्ये माकपाच्या पक्ष कार्यालयात तिरंगा फडकवण्यात आला आणि या निमित्त राष्ट्रागीत जन-गण-मन, हे सुद्धा गायले गेले. माकपा केंद्रीय कमिटीच्या बैठकीत स्वातंत्र्य दिनानिमित्त पक्ष कार्यालयात तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजच डाव्या पक्षांचे प्रमुख नेते स्वातंत्र्याची आव्हाने आणि डाव्या पक्षांची भूमिका यावर चर्चा करणार आहेत.

दिल्लीसह संपूर्ण बंगालमध्ये फडकला तिरंगा

दिल्लीसह बंगालच्या विविध जिल्हा माकपा कार्यालयांमध्ये आज तिरंगा फडकला. दिल्लीतील माकपा कार्यालयात वरिष्ठ नेते हन्नान मुल्ला यांनी तिरंगा फडकवला, तर सिलीगुडीमध्ये माजी मंत्री अशोक भट्टाचार्य यांनी तिरंगा फडकवला. यावेळी ते म्हणाले, भाजपाविरूद्धच्या लढाईत जनतेचे मत घेतले गेले नाही. केंद्र सरकार विरोधातील ही आघाडी निवडणूक आघाडी नाही. ममता आणि भाजपाविरोध सुरू राहिल. मी यापूर्वी सुद्धा राष्ट्रीय ध्वज फडकवला आहे. यावेळी मी पक्ष कार्यालयात झेंडा फडकवला आहे.

PM Modi | 75 आठवड्यात 75 वंदे भारत ट्रेन, सैनिकी शाळांमध्ये मुलींना सुद्धा प्रवेश; लाल किल्ल्यावरून PM मोदी यांनी केल्या ‘या’ 10 मोठ्या घोषणा

सात दशहकानंतर डाव्या पक्षांमध्ये झाला बदल

हा बदल जवळपास सत्तर वर्षानंतर झाला आहे, जेव्हा अविभाजित भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नारा दिला होता की, ‘हे स्वातंत्र्य खोटे आहे’. देशात भाजपाची वाढती ताकद आणि सतत होत असलेल्या पराभवानंतर डाव्या पक्षांनी राष्ट्रवादाबाबत आपल्या विचारांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. विधानसभा
निवडणुकीत येथे भाजपाने प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान मिळवले आहे, तर काँग्रेस आणि डाव्या
पक्षांच्या आघाडीचा दारूण पराभव झाला होता. या पराभवाने सीपीआयला (एम) विचार करणे
आणि बदल करणे भाग पडले आहे. आपल्या अस्तित्वावरील धोका पाहता हा ऐतिहासिक बदल होत आहे.

हे देखील वाचा

Petrol Price Today | ‘इथं’ 3 रुपये प्रति लीटर स्वस्त झाले पेट्रोल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Fixed Deposit | केवळ 3 वर्षाची FD केल्यास मिळेल 7 टक्केपेक्षा जास्त व्याज; ताबडतोब चेक करा ‘डिटेल्स’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  independence day 2021 left parties saying this freedom is false hoisted the tricolor in the party office for the first time

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update