MP : स्वस्त वीज-मोफत रेशन, सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ, CM शिवराज यांनी केल्या ‘या’ घोषणा

भोपाळ : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळच्या मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित राज्यस्तरीय स्वात्रंत्र्य दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या संबोधनात गरीब आणि मुलींवर जास्त भर दिला. सीएम शिवराज यांनी सोबतच घोषणासुद्धा केली की आता राज्यात कोणताही कार्यक्रम मुलींच्या पूजनाने सुरू होईल.

यावेळी त्यांनी आपल्या सरकारने केलेली कामे सुद्धा जनतेसमोर मांडली. सीएम शिवराज यांनी घोषणा केली की, सर्व क्षेत्रात अवैध आणि जास्त व्याजदराने सावकारांकडून गरिबांना 15 ऑगस्टपर्यंत देण्यात आलेले कर्जसुद्धा शून्य होईल. यासाठी आवश्यक कायदा लवकरच आणला जाईल. मुख्यमंत्री म्हणाले, मागासलेल्या वर्गासाठी आरक्षण 14 टक्क्यांवरून वाढवून 27 टक्के करण्यासाठी सरकार संपूर्ण मजबूतीने न्यायालयात आपली बाजू मांडत आहे.

सीएम शिवराज यांनी कोणत्याही शुल्काशिवाय धान्य देणे, हुशार विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण आणि लॅपटॉप देणे, आधुनिक सुविधांनी युक्त सीएम राईज स्कूल, महिला बचत गटांना चार टक्के व्याजदराने 1300 कोटी रूपयांपेक्षा जास्तीचे कर्ज देणे, एक जिल्हा एक उत्पादन या सिद्धांतावर जिल्ह्यांचे ब्रँडींग करण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचार्‍यांसाठी भोपाळमध्ये 50 बेडचे हॉस्पीटल बनवण्याची घोषणा केली आणि म्हटले 2023 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत नळाच्या माध्यमातून पाणी पोहचवण्याच्या योजनेंतर्गत एक कोटी घरांपर्यंत नळ कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांनी सर्व नागरी सुविधा ऑनलाइन उपलब्ध करण्याची घोषणा केली आणि म्हटले की, नर्मदा एक्सप्रेस-वे पासून नर्मदांचलमध्ये उद्योग, ईको टूरिझम आणि धार्मिक बाबींना प्रोत्साहन देण्यात येईल.

सीएमने नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी स्टार्ट यूअर बिझनेस इन थर्टी डेज योजनेची सुद्धा घोषणा केली. त्यांनी म्हटले की, प्रदेशातील नागरिकांचा सिंगल सिटीजन डाटाबेस तयार केला जाईल. ग्रामस्थांना अनिवासी भूखंडावर मालक्की हक्क दिला जाईल. कर्मचार्‍यांना देय सर्व लाभ दिले जातील. सीएम शिवराज यांनी म्हटले की, मुलींचे कल्याण आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. राज्यात लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत 78 हजारपेक्षा जास्त ई-सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहेत. पंतप्रधान मातृ वंदना योजनेंतर्गत 5 लाख 9 हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 84 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम टाकली गेली आहे.

सीएमने म्हटले की, मुख्यमंत्री कन्या विवाह योजना सुद्धा चालवली जात आहे. महिला आणि मुलींसंबंधीचे गुन्हे करणार्‍यांविरूद्ध झीरो टॉलरन्सचे धोरण राहील. गुन्हा करणारे संपूर्ण मानवतेचे शत्रू आहेत, त्यांना कोणत्याही स्थितीत सोडले जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या महामारीच्या काळाप्रमाणेच स्वस्त वीज देत राहणार असल्याचीही घोषणा केली.