पाकिस्तानला प्रत्येक ठिकाणी हरविण्यासाठी भारत ‘रेडी’, ‘ही’ आहे ‘पॉवर’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला. भारत सरकारच्या या निर्णयानंतर पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी अनेक देशांच्या भेटी गाठी घेत आहे. असे असले तरी पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट केले आहे की भारताचा हा अंतर्गत मुद्दा आहे. यात कोणाची मध्यस्थी सहन केली जाणार नाही.

मागील काही काळापासून भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातवरण आहे. यामुळे कधीही युद्धजण परिस्थिती उद्भवू शकते. असे असले तरी भारत या परिस्थितीत देखील पाकला तोंड देण्याच्या तयारीत आहे. एका अवाहलानुसार पाकिस्तान पेक्षा भारताकडे दुप्पटीने युद्ध सामुग्री आहे.

पाकला नमवण्यासाठी भारताची ताकद
सैन्याचा खर्चाचा विचार केल्यास भारतात ६६.५१ कोटी डॉलरची गुंतवणूक आहे. भारत जगातील ४ था सर्वात शक्तीशाली देश समजला जातो. तर पाकिस्तानचा मागील वर्षी सैन्यावरील खर्च ११.३७ कोटी डॉलर आहे.

एकूण विमानांच्या संख्येचा विचार करता, भारत पाकिस्तानच्या कितीतरी पट पुढे आहे. भारताकडे २०८२ विमान आहेत तर पाकिस्तानकडे १३४२ विमाने आहेत. यामुळे भारत जगात ४ थ्या स्थानी आहे. तर पाकिस्तान ७ व्या क्रमांकावर आहे.

भारताकडे जवळपास ३० लाखपेक्षा आधिक सैन्य आणि अर्धसैन्यदल आहे, या संख्येचा विचार केल्यास भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानकडे ९.३६ लाख सैन्य आहे.

तोफांच्या संख्येचा विचार केल्यास भारत जगातील ६ व्या स्थानावर आहे. भारतात ४१८४ टँक आहेत, तर पाकिस्तानकडे २२०० टँक आहे.

नौदलाच्या जहाजांचा विचार केल्यास भारताकडे एकूण २९५ जहाज आहेत, तर पाकिस्तानकडे १९७ जहाज आहेत. नौदलाच्या बाबत भारत पाकच्या कैक पट पुढे आहे. भारताकडे १६ सबमरिन आहेत तर पाककडे ५ सबमरिन आहेत.

एकच अशी जागा आहे ज्यात पाक भारताच्या पुढे आहे. आपण अणूबॉम्बचा विचार केला तर पाकिस्तानकडे १४० अण्वस्त्र आहेत तर भारताकडे ११० अण्वस्त्र आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like