‘स्वातंत्र दिनी’ भाषण देऊ इच्छिता, तर हे ‘भाषण’ नक्की वाचा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – या १५ ऑगस्टला देशभरात ७३ वा स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात येणार आहे. हा स्वातंत्रता दिवस अनेक जण उस्ताहात साजरा करण्यासाठी अनेक योजना आखत आहे. १५ ऑगस्टला लोक विविध पोशाख घालतात, घरांवर आणि वाहनांवर राष्ट्रीय ध्वज फडकवतात. याशिवाय शाळांमध्ये देखील विविध सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात येतो. जर तुम्हाला स्वातंत्रता दिनी भाषण देऊ इच्छित असल्यास तुम्ही या प्रकारचे भाषण देऊ शकतात.

स्वातंत्र दिवसासाठी भाषण –
मी तुम्हा सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देत आहे. मला ७३ व्या स्वतंत्रता दिवशी बोलण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. आज बरोबर ७३ वर्षापूर्वी आपल्याला स्वातंत्र मिळाले होते. देशाच्या स्वतंत्र्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि याचे वर्णन काही मिनिटात करणे शक्य नाही. प्रत्येक भारतीयासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. स्वातंत्र्यासाठी क्रांतीकारकांनी मोठे योगदान दिले आहे ते कधीच कोणीही विसरू शकत नाही. त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे आज भारत स्वातंत्र आहे. स्वतंत्रता दिवस हा ना की फक्त ब्रिटिशांपासून मुक्त मिळाली हे दर्शवत नाही तर हा दिवस देशाची ताकद दाखवते.

आपल्या वीर क्रांतीकारकांनी लढा दिल्यानंतर आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून आपण सर्व भारतीय १५ ऑगस्टपासून स्वतंत्रता दिवस साजरा करतो. आज आपल्या देशाचा वेगाने विकास होत आहे. देश वेगाने तंत्रज्ञान, शिक्षण, क्रिडा, वित्त आणि इतर अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. हे फक्त स्वांतत्र मिळाल्याने शक्य झाले.

परमाणू ऊर्जाने समृद्ध देशात भारताचा देखील समावेश आहे. ऑलंपिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स सारख्या खेळात भारताने आज आपली मान उंचावलेली आहे. भारतात उद्योग वाढत आहेत आणि यात जगभरातील कंपन्या गुंतवणूक करत आहेत. आज जगभरात भारताला महत्व दिले जाते. भारत देखील महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने प्रवास करत आहेत. शिक्षण क्षेत्रात देखील देशाने नव्याने उंची गाठत आहे.

भारतीय विद्यार्थी देशभरात आपले नाव मोठे करत आहेत. देशातील वैज्ञानिकांनी अत्यंत मेहनतीनंतर आंतराळ क्षेत्रात प्रगती केली आहे. याचे चंद्रयान – २ हे मोठे उदाहरण आहे. देशातील नागरिक देखील देशातील प्रगतीवर लक्ष देऊन काम करत आहे. असे अनेक क्षेत्र आहेत यात भारत अत्यंत मजूबत आहे. आज आपल्या देशातील सरकार समोर रोजगार निर्मितीचे मोठे आव्हान आहे. यामुळे आपल्याने एकत्र मिळून देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवेत. मी तुम्हाला माझे भाषण ऐकल्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो. याबरोबर मी एक शायरी वाचून दाखवू इच्छितो/ इच्छिते.

तन हमारा मिसाल है मोहब्बत की,
तोड़ता है दीवारें नफरत की,
ये मेरी खुश नसीबी है जो मिली जिन्दगी इस चमन में..
और भुला न सके कोई भी इसकी खूशबु सातों जनम में…

जय हिन्द! वंदे मातरम!

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like