विश्वविद्यालयामध्ये ‘या’ 10 प्रसिध्द महिलांच्या नावावर बनणार स्वतंत्र ‘पीठ’ !

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी राष्ट्रीय बालिका दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून नाव कमावणाऱ्या दहा प्रसिद्ध महिलांच्या नावाने विश्वविद्यालयामध्ये दहा स्वतंत्र पीठ स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. युजीसीच्या माध्यमातून दहा विभागांना या महिलांची नावे देण्यात आलेली आहेत.

ज्यांनी कला, साहित्य, विज्ञान, आरोग्य, वन संरक्षण, गणित, कविता लेखन आणि शिक्षा या क्षेत्रात सुधारणेचे काम केले आहे अशा अहिल्याबाई होळकर (प्रशासनिक), महादेवी वर्मा (साहित्य), रानी गैदीनलियू (स्वतंत्रता सेनानी), आनंदीबाई गोपाळराव जोशी (आरोग्य ), एम एस सुब्बूलक्ष्मी (कला), अमृता देवी बेनीवाल (वन संरक्षण), लीलावती(गणित), कमला सोहोने (विज्ञान), लालदेद (कविता), हंसा मेहता (शैक्षणिक सुधारणांसाठी) यांची नावे या पिठांना देण्यात आलेली आहेत.

हे शैक्षणिक सत्र 2020 पासून विद्यापीठांमध्ये अभ्यास आणि संशोधन सुरू केले जाईल. या महिला विद्वानांच्या नावावर असलेल्या या खंडपीठाचे कार्य महिलांना उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन, अभ्यास आणि संशोधनासाठी प्रेरित करणे आहे.

यूजीसीने यासाठी वेगळी 5 कोटी रुपये प्रति वर्षी खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. यामध्ये शिक्षकांची नियुक्ती, संशोधन आणि अभ्यासाचा खर्च समाविष्ठ केलेला आहे. सुरुवातीला याची स्थापना पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे त्यानंतर युजीसी याबाबतचे आकलन करणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like