राज्य मंत्रिमंडळाचे १२ महत्त्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयासह हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी शासकीय जमीन ‘पीएमआरडीए’कडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

१. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या हिश्स्याचा ‘व्यवहार्यता तफावत निधी’ उभारण्यासाठी शासकीय जमीनी ‘पीएमआरडीए’कडे वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली.

२. राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

३. मिरा-भाईंदर-वसई-विरार मध्ये वाढत्या लोकसंख्येला सुरक्षितता व कायदा सुव्यवस्था प्रदान करण्यासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला.

४. उर्वरीत शासकीय जमिनीवरील संपुष्टात आलेल्या व यापुढे संपणाऱ्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण करण्यासंबधीचे धोरण निश्चित करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला.

५. मुंबई- मेट्रो मार्ग १० च्या अंमलबजावणीस मान्यता. (गायमुख-शिवाजी चौक (मिरा रोड))

६. मुंबई-मेट्रो मार्ग ११ च्या अंमलबजावणीस मान्यता. (वडाळा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)

७. मेट्रो मार्ग – १२ च्या प्रकल्प अहवालासह त्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता

८. केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजना व विस्तारीत उज्ज्वला योजना २ च्या निकषात अपात्र ठरणाऱ्या कुटुंबांना गॅस जोडणीसाठी राज्य शासनाची स्वतंत्र योजना.

९. शासन खरेदी करत असलेल्या एअरबस कंपनीच्या बहुउद्देशीय हेलिकॉप्टरच्या परिक्षणासाठी एजन्सी निवडण्यास मान्यता.

१०. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लॅंट्स (NIMP) ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील गारखेडे येथील ५० एकर शासकीय जमीन केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाला देण्यास मान्यता.

११. मराठवाड्यातील सततच्या पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची ग्रीड करण्यात येणार असून त्यासाठी हायब्रीड ॲन्युईटी तत्त्वावर निविदा काढण्यास मान्यता.

१२. प्रलंबित प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी अतिरिक्त भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार.

आरोग्यविषयक वृत्त