रिक्षावाल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ : गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

रिक्षा चालकांचे आणि सामान्य नागरिकांचे एक विशिष्ट नाते असते. रिक्षावाला हा शहरातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख आदरानेच केला पाहिजे. रिक्षावाल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र रिक्षा चालक महामंडळ स्थापन केले आहे परंतु, अद्याप त्याचे काम सुरु झाले नाही. राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या वतीने सर्व रिक्षा संघटनांसोबत तत्काळ बैठक लावून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे दिले.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’513c0515-9fcd-11e8-a4aa-a591d1c945ee’]

शिवनेरी प्रतिष्ठान व शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, मानेकर सर, रिक्षा चालकांना मदत करणारे अजय दिक्षित, कराटे प्रशिक्षण देणारे रिक्षा चालक ज्ञानेश्वर सोनवणे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आणि रिक्षा चालकांच्या गुणवंत मुलांचा सत्कार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, लकी ड्रॉ काढण्यात आला.

याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, शिवनेरी प्रतिष्ठान व रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, आबा बाबर, भाजप माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश धाडवे, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, रोटरी क्लबचे ललित बोत्रा, नितीन किरीड, मराठा महासंघाचे अविनाश ताकवले, भाई शिंदे, संदीप आचार्य, अजय दीक्षित, किरण कद्रे, सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.