मल्टीप्लेक्स, चित्रपटगृहाबद्दलच्या ‘त्या’ तक्रारींसाठी स्वतंत्र कक्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मल्टीप्लेक्स व अन्य चित्रपटगृहातील शीतपेये व पाण्याच्या बाटल्या यांच्या किंमती तपासण्याची जोरदार मोहिम अन्‍न व नागरी पुरवठा विभागाने सुरू केली असून नागरिकांच्या तक्रारी नोंदवुन घेण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांनी (020) 26137114 या दुरध्वनी क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात अथवा [email protected] या ईमेलवर त्यांची तक्रार करावी असे आवाहन पुणे जिल्हयाचे वैधमापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक नि.प्र. उदमले यांनी केले आहे.
[amazon_link asins=’B07CSTV4B8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d9ddfbb-9a3d-11e8-8936-2949cac9352d’]

अन्‍न व नागरी पुरवठा विभागाने मल्टीप्लेक्स व चित्रपटगृहातील शीतपेये व पाण्याच्या बाटल्यांच्या किंमती तपासणी जोरदार मोहिम सुरू केली असून गेल्या दोन दिवसात कोथरूड येथील सिटी प्राईड आणि हडपसर परिसरातील अ‍ॅमनोरासह शहरातील इतर मॉलमधील 7 हून अधिक मल्टीप्लेक्समध्ये तपासणी केली आहे. याबाबत अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट म्हणाले की, पुण्यातील औंध येथील वेस्टएंड मॉल,सिटी प्राईड, केएफसी, बर्गर किंग, साफिरे फुड, सिजन मॉल, इनऑरबिट मॉल आणि पीव्हीआर सिनेमाज येथे पथकाने अचानक भेटी देवुन तपासणी केली आहे.

या मोहिमेत पॅकबंद वस्तुंच्या वेस्टनावरील, आवेष्टित वस्तुचे नांव, उत्पादक किंवा आवेष्टक यांचे नाव व पत्‍ता, कमाल किरकोळ विक्रीची (सर्व करांसह) किंमत, उत्पादनाची तारखी, निव्वळ वजन इत्यादि बाबींची तपासणी करण्यात आली आहे. पुणे जिल्हयाचे सहाय्यक नियंत्रक नितीन उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र आखरे, गिरीधर वाघमारे, प्रविण जोशी, प्रमोद कुडाळकर, संगमेश्‍वर राघोजी, सोमनाथ महाजन यांनी ही मोहिम राबविली आहे.
[amazon_link asins=’B01MU4PM6P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’63014413-9a3d-11e8-be51-8dcf03d35a0b’]
छापील दरापेक्षा अधिक दराने खाद्यपदार्थ व शीतपेये यांची विक्री होत असल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश अन्‍न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेवुन नियमात बदल करण्याचा प्रस्ताव अलिकडेच केंद्राकडे पाठविला होता. केंद्राने नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने अन्‍न व नागरी पुरवठा विभागाने कठोर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. या संदर्भातील तक्रारी नोंदवुन घेण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून तक्रारी नोंदविण्यासाठी ग्राहकांनी (020) 26137114 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा [email protected] या ईमेलवर त्यांची तक्रार नोंदवावी. अन्‍न व पुरवठा विभाग आगाऊ दराने विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.