Index Testing In HIV | नागाव सेंट्रल आणि स्पेशल जेलमध्ये 85 कैदी HIV पॉझिटिव्ह आढळले, नशेच्या व्यसनामुळे झाले संक्रमित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Index Testing In HIV | आसाम (Assam) च्या नागाव केंद्रीय कारागृहात आणि विशेष कारागृहात (Nagaon Central Jail and Special Jail) सप्टेंबरमध्ये एकुण 85 कैदी (inmates) तपासणीत एचआयव्ही पॉझिटिव्ह (Index Testing In HIV) आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या एका अधिकार्‍याने ही माहिती दिली.

 

नागाव बीपी सिव्हिल हॉस्पिटल (Nagaon BP Civil Hospital) चे अधीक्षक डॉ. एल. सी. नाथ (Superintendent Dr. L. C. Nath) यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, 85 एचआयव्ही (85 HIV-infected people) संक्रमितांपैकी 45 विशेष कारागृहातील आहेत आणि 40 नागावच्या केंद्रीय कारागृहातील आहेत.

 

डॉ. नाथ यांनी म्हटले की, हे सर्व नशेच्या व्यसनामुळे संक्रमित झाले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मागील महिन्यात 4 महिलांसह 88 लोक चाचणीत संक्रमित आढळले होते.

 

नागाव जिल्हा आरोग्य विभागाच्या सूत्रांनुसार, बहुतांश संक्रमित कैदी नशेच्या आहारी गेलेले आहेत. ते प्रतिबंधित औषध घेण्यासाठी एकाच सुईचा वापर करत होते, ज्यामुळे ते संसर्गाला बळी पडले.

 

आरोग्य विभागाचे मुख्य सचिव अनुराग गोयल यांनी सांगितले की,
आसाम राज्य एड्सनियंत्रण सोसायटीला (एएसएसीएस) आढळले की,
2002 पासून जून 2021 पर्यंत आसाममध्ये एकुण 20085 लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले.
कामरूप (एम) जिल्ह्यात सर्वात जास्त 6,888 आहेत, यानंतर कछारमध्ये 4609 आणि डिब्रूगढमध्ये 1245 सापडले आहेत.

 

आसामात कैद्यांमध्ये एचआयव्ही संसर्ग जास्त

त्यांनी सांगितले की, इंडेक्स टेस्टिंगमुळे (Index Testing In HIV) उच्च जोखमीच्या गटांमध्ये (एचआरजी) मोरीगाव,
नागाव आणि नलबाडी सारख्या जिल्ह्यांमध्ये एचआयव्हीच्या प्रकरणांमध्ये वाढ नोंदली गेली आहे.
ड्रग्ज इंजेक्शनमुळे जेलच्या कैद्यांमध्ये एचआयव्हीची प्रकरणे वाढली आहेत.

 

Web Title :- Index Testing In HIV | assam 85 prisoners of nagaon central jail and special jail test hiv positive

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Band | ‘महाविकास’ आघाडीनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 77 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | अधिकार्‍यांनीच एजन्सीबरोबर संगनमत करुन केला 20 लाखांचा घोळ ! महावितरणच्या दोघा अधिकार्‍यांसह चौघांवर गुन्हा दाखल