भारत 10 ‘ट्रिलियन’ डॉलर्सची अर्थव्यवस्था बनू शकेल, मुकेश अंबानी यांना ‘विश्वास’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम सुरु आहे. अर्थव्यवस्थेला आलेली तात्पुरती मरगळ आहे. भारतापुढे घेऊन जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. २०३० पर्य़ंत भारताची अर्थव्यवस्था १० ट्रिलियन होण्याची शक्यता असल्याचे रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील ५ वर्षात भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष ठेवले आहे.

मुकेश अंबानी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष ठेवले आहे. मी त्यांच्या या महत्वकांक्षी लक्षाचे समर्थन करतो. वास्तविक पाहता २०३० पर्यंत भारत १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल. याचा फायदा प्रत्येक भारतीयाला होईल. हे साध्य करणे शक्य आहे, आणि जरुरीचे आहे. अर्थव्यवस्थेच्या बर्‍याच क्षेत्रात मंदी आहे, परंतु ती तात्पुरती आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया खूप मजबूत आहे.

संरचनात्मक सुधारणांमुळे संधी वाढतील. भारतात राजकीय अस्थिरता दिसून येत आहे. सरकार व्यवसायाला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि त्यांच्या उत्पनातील असमानता दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. भारत पुढे जात असून शक्तीशाली भारताला पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असेही मुकेश अंबानी यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त