दिलासादायक ! ‘लॉकडाऊन’ दरम्यान रेल्वे चालवणार ‘पार्सल व्हॅन’, अत्यावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच दरम्यान देशातील सर्व प्रवासी रेल्वे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेने आता एक मोठा निर्णय घेतला असून रेल्वेने पार्सल व्हॅन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे देशातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु राहण्यास मदत होणार आहे. भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांनी यांची माहिती आज एका वृत्तसंस्थेला दिली. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु ठेवण्यासाठी रेल्वेने पार्सल व्हॅन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाने 22 मार्च पासून प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. त्याच बरोबर रेल्वेने प्रवासी गाड्यांना जोडलेले पार्सल व्हॅन देखील डिफॉल्टनुसार रद्द केल्या आहेत. पार्सल व्हॅनचा संबंध प्रवाशांसी असून यामधून भाजीपाली, दूध आणि मासे यासारखे जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असून या व्हॅनमधून याची वाहतूक केली जाते.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या विशेष पार्सल एक्सप्रेस गाड्या नवी दिल्ली-गुवाहाटी, नवी दिल्ली – मुंबई, नवी दिल्ली- कल्याण, नवी दिल्ली-हावडा, चंदीगड-जयपूर आणि मोगा-चांगसारी मार्गावर धावणार आहेत. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, पार्सल सेवा पुन्हा सुरु करणे आवश्यक होते. कारण स्थानिक बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होत होता. कारण लॉकडाऊनमुळे बहुतांश कामगार लोडिंग-अपलोडिंगमध्ये व्यस्त होते तर काही कामगार लॉकडाऊनमुळे गावी परतले आहेत.

रेल्वेने प्रवासी सेवा रद्द केल्यामुळे पार्सल व्हॅन चालवणे अशक्य झाले होते. मात्र आता रेल्वेने जाहीर केले आहे की, वेळापत्रकानुसार नियोजीत मार्गावर अशा पार्सल व्हॅन चालवण्यात येणार आहेत. ट्रकमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक होत आहे परंतु याचे प्रमाण कमी झाले आहे. जर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक रेल्वेतून केली तर ती वेळेत मिळेल आणि मुख्य म्हणजे वेळ वाचणार आहे.

पार्सल व्हॅनमध्ये वैद्यकीय पुरवठा, वैद्यकीय उपकरणे, लहान आकारातील अन्नाचे पॅकेट यासारख्या अत्यावश्यक वस्तूंची ने-आण केली जाणार आहे. संबंधित विभागांनी स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून पार्सल डेपो व मालवाहतुक शेडमध्ये मजूरांना आणावे. जेणेकरून पार्लस व्हॅनमधून येणारा आणि पाठवण्यात येणाऱ्या वस्तूंची लोडिग आणि अपलोडिंग व्यवस्थितपणे होईल.