‘द्वेष’ आणि ‘अश्लीलता’ पसरवणार्‍या 500 वेबसाइटवर भारतात बंदी, आणखी काहींच्या विरूद्ध अ‍ॅक्शनची तयारी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्ली पोलीसांच्या सायबर सेलने अश्लीलता आणि द्वेष पसरवणार्‍या सुमारे 500 वेबसाइट बंद केल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या सायबर क्राइम प्रीव्हेंशन अगेन्स्ट वूमन अ‍ॅड चिल्ड्रन (सीसीपीडब्लूसी) आणि सायबर सेलला मिळालेल्या तक्रारींच्या आधारावर कारवाई करत मागील 18 महिन्यात सुमारे 50 सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे.

गृह मंत्रालयांतर्गत काम करणार्‍या दिल्ली पोलीस सायबर सेलच्या सूत्रांनुसार काही वेबसाइटविरूद्ध आणखी कारवाई केली जाणार आहे. यामध्ये अनेक सोशल मीडिया पोस्टच्या युआरएलचा समावेश आहे. या अन्य देशांच्या प्रतिबंधित संघटनांद्वारे चालवल्या जात आहे.

या प्रतिबंधित संघटनांनी स्लीपर सेलच्या मदतीने सोशल मीडियावर हजारोच्या संख्येने अशी अकाऊंट तयार केली आहेत, ज्याद्वारे आक्षेपार्ह, राष्ट्रविरोधी आणि समाजात द्वेष वाढवणारा मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. सायबर सेलकडून अशा अकाऊंटची ओळख पटवून ती बंद केली जात आहेत.

सायबर सेलचे डीसीपी अनेश रॉय यांच्यानुसार आक्षेपार्ह सोशल नेटवर्किंग साईट बंद करण्यासाठी काही दिवसांच्या अंतराने संबंधित सोशल नेटवर्कचे संचालकांसह मिळून कारवाई केली जाते. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि यासाठी सायबर सेल नेहमी सोशल मीडियावर नजर ठेवून असतो.

मागील 18 महिन्यांत अशाप्रकारच्या 500 पेक्षा जास्त यूआरएल बॅन करण्यात आल्या. याच्या संबंधीत सुमारे 50 आरोपींवर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आली. परंतु, या प्रकरणात आरोपींची अटक आणि पुढील कारवाई पूर्णपणे तक्रारदारांवर अवलंबून आहे.