भारताचा नवीन ‘युवराज’, आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध ‘या’ खेळाडूची ‘दम’दार खेळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार विजय मिळवत 69 धावांनी मात केली. या सामन्यात भारताच्या युजवेन्द्र चहल याने पाच विकेट घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

भारतीय ‘अ’ संघानं पहिल्याच एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा धुव्वा उडवला. चहलच्या पाच विकेटसह भारतानं 69 धावांनी आफ्रिकेवर विजय मिळवला.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला येत भारतीय संघाने 50 षटकात 327 धावांचा डोंगर उभारला. यामध्ये अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याचबरोबर काल शिवम दुबे याने केलेल्या खेळीमुळे त्याची भारताचा माजी फलंदाज युवराज सिंह याच्याबरोबर तुलना होऊ लागली आहे.

याचं कारण म्हणजे दुबेनं गेल्या वर्षी रणजी चषकमध्ये एकाच सामन्या त 5 षटकार लगावले होते. या त्याच्या आक्रमक खेळीमुळे त्याला आयपीएल 2019मध्ये बंगळूरू संघानं तब्बल 5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

सोशल मीडियावर त्याला युवा युवराज म्हणून संबोधले जात आहे. या सामन्यात त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने मागील वर्षी रणजी सामन्यात एका सामन्यात सलग 5 षटकार खेचले होते. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये मोठी किंमत देखील मिळाली होती. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल 5 कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र या आयपीएलमध्ये त्याला 4 सामन्यात केवळ 40 धावा करता आल्या होत्या.

मात्र आयपीएलमध्ये दुबेला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानं 4 सामन्यात केवळ 40 धावा केल्या. तर, लिस्ट एमध्ये 23 सामन्यात त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही.

दरम्यान, त्याला लवकरच भारतीय संघात स्थान मिळेल अशी शक्यता नेटिझन्सकडून व्यक्त करण्यात येत असून त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याने याची सुरुवात देखील केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –