भारतानं चीनला धडा शिकवण्यासाठी उचललं कठोर पाऊल ! आता ‘या’ वस्तूंवर देखील लागणार मोठा Tax

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनला धडा शिकवण्यासाठी भारत कित्येक कठोर पावले उचलत आहे. आता भारताने चीनच्या आयातीवर आळा घालण्यासाठी चीनकडून आयात होणाऱ्या काही मेजरींग टेप आणि पार्टस व कंपोनंटवर पाच वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्यूटी लागू केली आहे. यामुळे देशातील स्वस्त चिनी मालावर आळा बसेल. भारत-चीन लाइन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलवर नुकत्याच झालेल्या हिंसक चकमकीत आपल्या देशातील २० शूर सैनिक शहीद झाले होते. त्यानंतरच भारतात चीनविरूद्ध वातावरण आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू आहे आणि सरकार अनेक मार्गांनी चिनी आयातीला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. चिनी आयात आणि गुंतवणूकीच्या बाबतीत सतत कठोरता दाखवली जात आहे.

पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा वाढवली अँटी डम्पिंग ड्युटी
एका वृत्तसंस्थेनुसार, डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीज (डीजीटीआर) च्या तपास शाखेने चीन आयातीवरील कर कायम ठेवण्याची शिफारस केली होती. यानंतर चीनमधून आयात केले जाणारे स्टील आणि फायबर ग्लास मेजरींग टेपवर अँटी डम्पिंग ड्यूटी लावण्यात आली. ही ड्यूटी प्रथम ९ जुलै २०१५ रोजी पाच वर्षांसाठी लागू करण्यात आली होती. आता ती पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा वाढवण्यात आली आहे.

चीन करत होता डम्पिंग
डीजीटीआरने आपल्या तपासणी अहवालात म्हटले आहे की, चीन या वस्तू भारतीय बाजारात सातत्याने डम्पिंग करत आहे. डम्पिंगमुळे किंमती खूपच कमी होतात. जर त्यांच्यावर ड्युटी लागू केली गेली नाही, तर ते भारतीय बाजारपेठेत भरले जातील. या स्वस्त चिनी वस्तूंपासून भारतीय उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी अँटी-डम्पिंग ड्युटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकार हवे तर ५ वर्षांपूर्वी हा कर हटवू शकते
महसूल विभागानेही एका अधिसूचनेत म्हटले आहे की, चीनकडून आयात होणारे स्टील व फायबर ग्लास मेजरींग टेप व त्याचे पार्ट व कंपोनंटवर पाच वर्षांसाठी अँटी डम्पिंग शुल्क लागू केले जाईल. जर सरकारला हवे तर ते अगोदरही ते हटवू शकते. काही कंपन्यांना प्रति किलो १.८३ डॉलर अँटी डम्पिंग ड्युटी आणि काहींवर प्रति किलो २.५६ डॉलर अँटी डम्पिंग ड्युटी लावण्यात आली आहे. ही ड्युटी भारतीय रुपयांमध्ये द्यावी लागेल.