INDIA Alliance-Nitish Kumar | इंडिया आघाडीकडून PM पदासाठी नितीश कुमारांच्या नावाची घोषणा?, मोठ्या नेत्याचा दावा

नवी दिल्ली : INDIA Alliance-Nitish Kumar | एनडीएविरूद्ध दंड थोपटलेल्या इंडिया आघाडीतून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण, याबाबत रोज नवनवीन दावे करण्यात येत आहेत. आता जनता दल युनायटेड पक्षाच्या एका नेत्याने दावा केला आहे की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधान पदासाठी आवश्यक असणारे सगळे गुण आहेत. जेव्हा इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाची घोषणा होईल तेव्हा ते नितीश कुमार यांचेच नाव असेल. (INDIA Alliance-Nitish Kumar)

हा दावा जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहार विधानसभेचे उपाध्यक्ष असलेले माहेश्वर हजारी यांनी केले आहे. हजारी यांच्या या वक्तव्यामुळे इंडिया आघाडीत काय होणार? खरोखरच पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमार यांचे नाव जाहीर होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. ‘आज तक’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. (INDIA Alliance-Nitish Kumar)

जेडीयूच्या सर्व आघाड्यांची बैठक नितीश कुमार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्यानंतर हजारी यांनी हे वक्तव्य केले.

हजारी म्हणाले, नितीश कुमार हे देशातले सर्वात मोठे समाजवादी नेते आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटले होते की, राम मनोहर लोहिया आणि जेपी यांच्यानंतर नितीश कुमार मोठे समाजवादी नेते आहेत. ते पाच वर्षे भारत सरकारमध्ये मंत्री होते. १८ वर्षे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यापेक्षा योग्यता असलेला दुसरा नेता नाही.

हजारी म्हणाले, इंडिया आघाडीची एकजुट खऱ्या अर्थाने नितीश कुमार यांनी केली. त्यामुळे आज नाही तर उद्या त्यांच्या उमेदवारीची घोषणा इंडिया आघाडीकडून नक्की होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’