India and China | भारत-चीनमधील पुर्व लडाखमधील सीमावाद जवळपास संपुष्टात, गोगरा हाईट्समधून मागे हटली इंडिया आणि चायनाची आर्मी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  India and China | भारत आणि चीनमध्ये (India and China) पूर्व लडाख (Ladakh) मध्ये मोठ्या कालावधीपासून सुरू असलेला सीमावाद (border dispute) आता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. 12व्या राऊंटच्या कमांडर लेव्हलच्या चर्चेनंतर दोन्ही लष्कर (both armies) गोगरा परिसरातून (Gogra area) मागे हटले आहे. 4-5 ऑगस्ट दरम्यान दोन्ही लष्करांनी ही कारवाई केली आहे.

परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा या परिसरातून मागे हटण्याचा निर्णय झाला होता.
भारत आणि चीनच्या सैन्याद्वारे बनवण्यात आलेल्या सर्व अस्थायी आणि त्यांसबंधी इतर संरचना उद्ध्वस्त (demolished) करण्यात आल्या असून तसे मान्य करण्यात आले आहे.

12व्या टप्प्यातील बैठकीत मागे हटण्यावर सहमती (Agreed to withdraw at the 12th round meeting) काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनमध्ये मोल्डोमध्ये झालेल्या 12 व्या टप्प्यातील
चर्चेत दोन्ही देश पेट्रोल पॉईंट 17अ पासून सैनिकांना हटवण्यावर सहमत झाले होते.
जो पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये फ्रिक्शन पॉईंटपैकी एक आहे.
12व्या टप्प्यातील चर्चेदरम्यान दोन्ही बाजूकडील चर्चेत पीपी-17अ ज्यास गोगरा सुद्धा म्हटले जाते, तेथून मागे हटण्यावर तडजोड झाली होती.

 

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत चर्चा

चर्चेच्यानंतर जारी वक्तव्यानुसार, दोन्ही बाजूंमध्ये भारत-चीन सीमाक्षेत्राच्या पश्चिम क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) बाबत चर्चा झाली.
बैठक रचनात्मक होत, ज्यात आपसातील सहमती आणखी वाढली.
दोन्ही बाजू तडजोड आणि प्रोटोकॉलनुसार उर्वरित मुद्दे लवकरच सोडवणे आणि चर्चेची गती कायम राखण्यावर सहमत झाल्या.

15 जून 2020 ला झाला हिंसक संघर्ष

भारत आणि चीनच्या लष्करामध्ये सीमेवर हा वाद मागील वर्षी मेमध्ये पँगोंग सरोवरात सुरूझाला होता आणि दोन्ही बाजूंनी यानंतर येथे मोठ्या संख्येने सैन्य वाढवले होते.
15 जून, 2020 रोजी गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते.

 

Web Title : India and China | major breakthrough india china disengage in eastern ladakhs gogra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra School Reopen | पुढील आठवड्यात शाळा सुरु करण्याचा विचार?

Pune Corporation | ऍमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या निविदांना मंजुरी देण्याचे अधिकार ‘स्थायी समितीकडे’; प्रस्ताव मान्यतेसाठी ‘स्टॅन्डींग’च्या समोर

Ration card | घर बदलताना रेशन कार्ड हस्तांतरण करायचंय? जाणून घ्या एकदम सोपी प्रक्रिया