अफगाणिस्तानच्या शेजारीच भारत, ISIS विरूध्द तर लढावच लागेल : डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान सध्या अफगाणिस्तानमधील दहशतवादी तळ असलेल्या कुनार प्रांतात मिसाइल डागत असल्याचे समोर आल्यावर आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारताने अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेट विरोधात लढा देण्याचे आवाहन केले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या विरोधात भारत, रशिया, तुर्क, इराक आणि पाकिस्तान यांनी महत्वाची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.

ट्रम्प तक्रारीच्या स्वरुपात म्हणाले, 7000 मैल दूर अंंतरावरील अमेरिका अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करत आहे तर बाकी देश मात्र यात कोणतीही मदत करत नाहीत.

अफगाणिस्तानमधील आयएसआयच्या वाढत्या सक्रियतेबद्दल ट्रम्प यांनी सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, भारत तेथे उपस्थित आहे परंतू दहशतवाद विरोधात लढा देत नाही. अफगाणिस्तानच्या सीमेवर पाक आहे, पाक त्या विरोधात लढत तर आहे परंतू त्यासाठीचे प्रयत्न अत्यल्प आहेत. जेथे जेथे आयएसआय सक्रीय आहे तेथे तेथे त्या त्या देशांना त्यांच्याशी लढावे लागेल.

ट्रम्प म्हणाले, भारत अफगाणिस्तानमध्ये विकास कार्य राबवत आहे. परंतू भारताने तेथे कोणतेही दहशतवाद विरोधी अभियान राबवले नाही आणि ना की या कारवाईत सहभाग घेतला.

सिरियात आपली सक्रियता कमी झाल्याने आयएसआय आता अफगाणिस्तानात आपले पाय पसरवत आहे. काही दिवसांपूर्व अफगाणिस्तानात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 63 लोक मारले गेले.
मागील 18 वर्षापासून अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानात आहे, परंतू आता अमेरिका इतर देशांनी देखील योगदान देण्याचे आवाहन करत आहे. तसेच ट्रम्प यांनी संकेत दिला आहे की ते अफगाणिस्तानमधून सैन्य परत बोलावणार नाहीत.