देशात पहिल्यांदाच पाण्यामध्ये धावणार रेल्वे, मंत्री पियुष गोयल यांनी शेअर केला ‘व्हिडीओ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने कायमच आपल्या प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा दिल्या आहेत. आता भारतात अंडर वॉटर ट्रेन धावणार आहे. भारतात पहिली अंडर वॉटर रेल्वे चालवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील ही पहिली रेल्वे कोलकतामध्ये हुगळी नदीतून धावणार आहे. गुरुवारी या संबंधित घोषणा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. प्रकल्पासाठीचा पहिला टप्पा तयार आहे, लवकर ही रेल्वे सामान्य लोकांसाठी सुरु होणार आहे.

येथे धावणार रेल्वे –
हुगळी नदी खाली यासाठी बोगदा तयार करण्यात आला आहे. १६ किलोमीटरचा प्रवास करुन ही रेल्वे सेक्टर ५ पासून हावडा मैदान पर्यंत जाईल. यासाठी दोन वेगवेगळे टप्पे तयार करण्यात आले आहेत. पहिला टप्पा ५ किलोमीटरचा असणार आहे, हा टप्पा जवळपास तयार आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वे सेक्टर ५ पर्यंत पोहचेल त्यानंतर पुन्हा एकदा स्लॉट घेऊन रेल्वे हावडा मैदानापर्यंत पोहचेल. हे अंतर पूर्ण करण्यासाठी फक्त अर्धातासाचा कालावधी लागेल.

हा बोगदा बनवण्यासाठी एक विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा बोगदा पाण्याच्या आतून जाणार आहे. पाण्यातून जाणाऱ्या या रेल्वेसाठी चार सुरक्षा कवच लावण्यात आले आहेत. या रेल्वेची घोषणा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून ट्विट करत करण्यात आली. उत्कृष्ट इंजिनियरिंगचे उदाहरण म्हणजे ही रेल्वे, देशात सतत रेल्वेच्या प्रगतीचे हे प्रतिक आहे. यामुळे कोलकत्यातील रहिवाशांना याच्या सुविधा मिळतील आणि देशाला त्याचा गर्व असेल.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like