पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भारताने पाकिस्तानला केले ‘हे’ विशेष आवाहन

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानास पाकिस्तानच्या हवाई मार्गातून (एअरस्पेस मधून) जाण्याची सुट मिळावी यासाठी भारताने पाकिस्तानला विशेष आवाहन केले आहे. दरम्यान, पाकिस्तानने त्याच्या हवाई मार्गातून भारतीय विमानांना जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे भारतीय विमान पाकिस्तानी हवाई मार्गातून जावु शकत नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंघाय को-ऑपरेशन ऑर्गेनाइजेशनच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विमानास सुट द्यावी यासाठी भारताने पाकिस्तानला विशेष आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 आणि 14 जूनला किर्गिझस्तानची राजधानी बिष्केक एससीओच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट मंत्र्यांना ही सुट देण्यात आलेली आहे.

भारताने बालाकोट येथे एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने 11 हवाई मार्गांपैकी केवळ 2 मार्गातुन भारतीय विमानांना जाण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे भारतीय विमानांना लांबच्या मार्गाचा अवलंब करून दुसर्‍या देशात जावे लागते. जर, पाकिस्तानने सुट दिली तर भारतीय विमान केवळ 4 तासात बिष्केकला पोहचु शकते. मात्र, पाकिस्तानने त्याचे हवाई मार्ग वापरण्याची परवानगी दिली नाही तर भारतीय विमानाला बिष्केकला पोहचण्यासाठी 8 तास लागु शकतात. मे महिन्याच्या सुरवातीला भारताने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना भारतीय हवाई मार्गाचा वापर करून मालदीव आणि श्रीलंका येथे जाण्याची परवानगी दिली होती.

त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पाकिस्तानी हवाई मार्गाचा वापर करून एससीओ बैठकीला जाण्यास परवानगी दिली होती. मात्र, श्रीलंकामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरेशी हे श्रीलंकेला गेले नव्हते. पाकिस्तानने त्याच्या हवाई मार्गावर 27 फेबु्रवारीपासुन बंदी घातली होती. ती बंदी 15 जून पर्यंत वाढवली असल्याने भारतीय विमानांचे भाडे खुप वाढले आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

हवेच्या प्रदुषणामुळे ही होतो अनियमित मासिक पाळीचा त्रास

अंघोळीच्या पाण्यात टाका ‘हा’ पदार्थ ; उजळेल सौंदर्य

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसासह डोळयांनाही धोका !