… म्हणून भारतातून ‘अवैध’ बांगलादेशी परत जाणार ! बांगलादेशानं मागितली ‘इथं’ राहणार्‍यांची यादी

ढाका : वृत्तसंस्था – भारतात अवैधरित्या राहणारे बांगलादेशी नागरिक पुन्हा आपल्या देशात जाऊ शकतात, असे संकेत बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी दिले आहेत. मोमेन यांनी भारताला विनंती केली आहे की, जर तुमच्याकडे अवैधरित्या रहात असलेल्या बांगलादेशी नागरिकांची यादी असेल तर ती जाहीर करावी, आम्ही त्यांना परतीसाठी परवानगी देऊ.

बांगलादेशावर NRCचा प्रभाव नाही –
भारतात लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत मोमेन यांनी म्हटले आहे की, बांगलादेश आणि भारताचे संबंध सामान्य आणि खुप चांगले आहेत आणि यावर कोणताही परिणाम होणार नाही. भारतात नागरिकत्व कायद्यावरून उग्र आंदोलने सुरू झाल्यानंतर मोमेन यांनी गुरूवारी आपला भारत दौरा रद्द केला होता. वेळेच्या अभावामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोमेन म्हटले की, भारताने एनआरसीला अंतर्गत विषय म्हटले आहे. तसेच ढाकाला अश्वासीत केले आहे की, याचा बांगलादेशवर परिणाम होणार नाही.

त्यांना परत पाठवू –
मोमेन म्हणाले, काही भारतीय नागरिक आर्थिक कारणांसाठी दलालांद्वारे बांगलादेशात घुसखोरी करत आहेत. जर आमच्या नागरिकांशिवाय कुणी बांगलादेशात घुसत असेल तर आम्ही त्यास परत पाठवू.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/