‘व्हॉट्स अ‍ॅप’ वापरण्यासाठी ‘अत्यंत’ महत्वाची बातमी, घ्या जाणून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सहज, जलद आणि चटपटीत संवादांचे सर्वात प्रभावी माध्यम बनलेल्या व्हॉट्सअ‍ॅपचा गैरवापरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठवण्यात येणाऱ्या फेक मेसेजेसला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून मेसेज पाठवण्यासाठी ‘फिंगरप्रिंट’ अनिवार्य होण्याची शक्यता आहे.

मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. त्यामुळे एखादा मेसेज सर्वात आधी कोणी पाठवला आणि किती जणांनी तो फॉरवर्ड केला आहे याचा शोध घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ‘फिंगरप्रिंट’ अनिवार्य करण्याचा विचार करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने फिंगरप्रिंट अनिवार्य केल्यास भविष्यात तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, फोटो, व्हीडिओ किंवा इतर कोणताही कन्टेट पाठवायला असेल, तर सर्वात आधी फिंगर प्रिंट सिस्टमद्वारे तुमची ओळख पटवावी लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणारे मेसेज नेमके कोणी पाठवायला सुरुवात केली आहे हे शोधणं शक्य होणार आहे.

फिंगरप्रिंट लॉक
दरम्यान काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझर्ससाठी ‘फिंगरप्रिंट लॉक’ हे नवं फिचर लाँच केलं आहे. फिंगरप्रिंट लॉक’ मुळे आता व्हॉट्सअ‍ॅप वरील चॅट सुरक्षित राहणार आहेत. मोबाईल फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सरचा यासाठी उपयोग होणार आहे

आरोग्यविषयक बातम्या

प्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

Loading...
You might also like