India Australia Women T20 Series | भारत-ऑस्ट्रेलिया महिला ट्वेन्टी-20 मालिका आजपासून; कोण करणार विजयी सुरुवात?

पोलीसनामा ऑनलाइन : India Australia Women T20 Series | आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला ट्वेन्टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ पहिला सामना जिंकून विजयाची सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहेत. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहे. ट्वेन्टी-20 मालिकेतील पहिला सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. या मालिकेपूर्वी महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवारची ‘एनसीए’मध्ये बदली करण्यात आली आणि ऋषिकेश कानिटकर यांची महिलांच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. (India Australia Women T20 Series)

या सामन्यात संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच जेमिमा रॉड्रिग्जदेखील संघात पुनरागमन केल्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तसेच अष्टपैलू देविका वैद्यला आठ वर्षांनंतर ट्वेन्टी-20 संघात स्थान मिळाले आहे. रेणुका सिंह ठाकूर व दीप्ती शर्मा या दोघींवर गोलंदाजीची कमान असणार आहे, तर दुसरीकडे एलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. (India Australia Women T20 Series)

या मालिकेसाठी भारतीय महिला संघ –

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह ठाकूर, मेघना सिंह, अंजली सरवनी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष, हरलीन देओल.

या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन महिला संघ –

ऑस्ट्रेलिया : एलिसा हिली (कर्णधार), तहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, निकोला कॅरी, अ‍ॅश्ले गार्डनर, किम गार्थ, हीथर ग्राहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफील्ड, बेथ मूनी, एलिसा पेरी, मेगन शूट, अ‍ॅनाबेल सदरलँड.

कुठे आणि कधी पाहता येणार सामना?

वेळ : सायं. 7 वा. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स फर्स्टवर हा सामना पाहता येणार आहे.

Web Title :- India Australia Women T20 Series | aim for the winning opening india australia women twenty20 series from today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Diabetes | मधुमेही रूग्णांवर पाय कापण्याची आली वेळ, तुम्ही चुकून देखील या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Stretch Marks | गरोदर महिलांनी पहिल्या महिन्यापासून लावण्यास सुरू करावी ‘ही’ एक गोष्ट, स्ट्रेच मार्क्सची समस्या होईल दूर