कोरियन कंपनीच्या रॅपिड अँटीजन टेस्ट किटमध्ये सापडली त्रुटी, 7 दिवसांचा लावला बॅन

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची कंपनी एसडी बॉयोसेंसर्सवर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन (सीडीएससीओ) ने 7 दिवसांचा प्रतिबंध लावला आहे. कंपनीच्या रॅपिड अँटीजन टेस्ट किटची आयात, विक्री आणि वितरणावर हा बॅन लागू राहील. सीडीएससीओचे म्हणणे आहे की, कंपनी सेंसिटिव्हिटी आणि इतर बाबतीत किमान गरजा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली आहे. या निर्णयासह सीडीएससीओने कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी करून विचारले आहे की, कंपनीचे आयात लायसन्स कॅन्सल किंवा सस्पेंड का करण्यात येऊ नये.

भारतात विक्री आणि वापरासाठी कोणत्याही रॅपिड अँटीजन टेस्ट किटला किमान 95 टक्के स्पेसिफिसिटी आणि 50 टक्के सेंसिटिव्हिटीला मापदंडावर सिद्ध व्हावे लागते. यानंतरच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून अप्रूव्हल दिले जाते. कंपनीने म्हटले होते की, सॅम्पल कलेक्शन आणि प्रक्रिया कारणांमुळे अँटीजन टेस्ट किट मापदंडावर सिद्ध होऊ शकले नाहीत.

यानंतर ताबडतोब सर्व राज्यांच्या ड्रग कंट्रोलरला एक नोटीस पाठवून विशेष बॅच नंबरच्या सर्व किट्सचा वापर न करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व किटमध्ये 7 डिसेंबरला त्रुटी आढळल्या होत्या, हिंदुस्तान टाइम्सने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते.

आदेशात म्हटले आहे की, सार्वजनिक हितासाठी, ड्रग्ज आणि कास्मेटिक्स अ‍ॅक्ट अँड रूल्सनुसार, निर्देश दिले जात आहेत की, स्टँडर्ड क्यू कोविड-19 अँटीजन टेस्ट परत मागवाव्यात आणि याबाबत सर्व डिस्ट्रीब्यूटर्सला कळवण्यात यावे, ज्यांना पुरवठा करण्यात आला, आणि सांगावे की, किटचा वापर तात्काळ प्रभावाने रोखावा. सोबतच आदेशात कंपनीला स्टँडर्ड क्यू कोविड-19 अँटीजन टेस्ट किटचे पुढील सात दिवसांपर्यंत आयात आणि वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जूनमध्ये दिल्लीत कोरोना व्हायरस टेस्टची संख्या वाढवण्यासाठी हे किट आयात करण्यात आले होते. आयसीएमआर आणि एम्सच्या सुरूवातीच्या पाहणीत किटमध्ये 99.3 टक्के ते 100 टक्केच्या स्पेशिफिसिटीसह 50.6 टक्के ते 84 टक्केच्या दरम्यान सेंसिटिव्हिटी आढळली आहे.