‘कोरोना’ विरूद्धच्या लढाईत भारताची स्थिती चांगली, महाराष्ट्र आणि केरळात देशातील 40 % सक्रिय प्रकरणे

नवी दिल्ली : कोरोना विरूद्धच्या लढाईत भारताची स्थिती सातत्याने चांगली होत चालली आहे. मागील काही दिवसांपासून नवीन प्रकरणांपेक्षा जास्त रूग्ण बरे होत आहेत, ज्यामुळे सक्रिय प्रकरणांची संख्या कमी होत आहे. आता सक्रिय प्रकरणे कमी होऊन तीन लाखांच्या जवळपास आली आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा आकडा सुद्धा 96 लाखांच्या जवळपास पोहचला आहे. मात्र, एक कोटीपेक्षा जास्त संक्रमितांचा भारत जगातील दुसरा देश सुद्धा बनला आहे. 1 लाख 45 हजारपेक्षा जास्त रूग्णांचा आतापर्यंत जीव गेला आहे.

कोरोनाची सक्रिय प्रकरणे 3.05 लाख
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून काल जारी केलेल्या आकड्यानुसार सक्रिय प्रकरणांमध्ये 3,407 ची घट झाली आहे. सक्रिय प्रकरणांची संख्या 3.05 लाख झाली आहे, जी एकुण प्रकरणांच्या 3.04 टक्के आहे.

कोरोना संसर्गाने 1 लाख 45 हजार 477 जणांचा मृत्यू
एकुण संक्रमित 1 कोटी 31 हजारपेक्षा जास्त झाले आहेत, ज्यापैकी 95.80 लाख रूग्ण पूर्णपणे ठिक झाले आहेत. तर एकुण मृतांची संख्या 1 लाख 45 हजार 477 झाली आहे. यासोबतच रूग्ण बरे होण्याचा दर वाढून 95.51 टक्के झाला आहे. मृत्युदर 1.45 टक्केवर कायम आहे.

कोरोना महामारीने महाराष्ट्रात सर्वात जास्त मृत्यू
सर्वात जास्त महाराष्ट्रात 48 हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. यानंतर कर्नाटकमध्ये 12 हजारपेक्षा जास्त, तमिळनाडुत सुमारे 12 हजार आणि दिल्लीत 10 हजारपेक्षा जास्त लोकांचा आतापर्यंत महामारीमुळे मृत्यू झाला आहे.

40 टक्के सक्रिय प्रकरणे महाराष्ट्र आणि केरळात
देशात सक्रिय प्रकरणांमध्ये एकट्या महाराष्ट्र आणि केरळातच 40 टक्के प्रकरणे आहेत. 33 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये 20 हजारपेक्षा कमी सक्रिय केस आहेत. महाराष्ट्र आणि केरळशिवाय सक्रिय प्रकरणात बंगाल (19,065), उत्तर प्रदेश (17,955) आणि छत्तीसगढ (17,488) यांचाही समावेश आहे.