भारताकडून ‘ड्रॅगन’ला आणखी एक मोठा झटका ! मोदी सरकारकडून कोळसा खाणींच्या लिलावात चीनी कंपन्यांना ‘नो-एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारताने आपला शेजारील देश चीनला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. मोदी सरकारने कोळसा खाणींच्या लिलावात चिनी कंपन्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने आज सीमाभागावरील चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांतील कंपन्यांना व्यावसायिक शोषणामुळे कोळसा खाणींच्या लिलावात भाग घेण्यास बंदी घातली आहे.

गुंतवणूक प्रस्तावांना शासकीय मार्गाने मंजुरी

कोळसा मंत्रालयानुसार, स्वयंचलित मार्गाने नवीन कामांत १०० टक्के एफडीआयला परवानगी असली तरीही, भारतासह जमिनी सीमा असलेल्या देशांकडून होणाऱ्या गुंतवणूकीच्या प्रस्तावांना केवळ शासकीय मार्गाद्वारेच मंजुरी दिली जाईल. याचा अर्थ असा की, कोणत्याही सहभागास अनुमती देण्यापूर्वी सरकार अशा प्रकारच्या प्रस्तावांची तपासणी करेल.

त्या कंपन्यांच्या प्रस्तावांनाही शासकीय मार्गावरुन जावे लागेल, ज्यांचे मालक जमिनी सीमेवर असलेल्या देशात राहतात किंवा तेथील नागरिक आहेत. निविदा कागदपत्रात स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, चीन आणि पाकिस्तानचा कोणताही नागरिक किंवा पाकिस्तानमध्ये समाविष्ट असलेली कोणतीही संस्था संरक्षण, अंतराळ, अणुऊर्जा सोडून आणि परकीय गुंतवणूकीसाठी प्रतिबंधित क्षेत्रे वगळता उर्वरित क्षेत्रात सरकारी मार्गानेच गुंतवणूक करू शकतात.

अगोदर काय नियम होता?

कोळसा मंत्रालयाने स्पष्टीकरण जारी केले आहे, जेणेकरून गुंतवणूकदारांना बोली लावण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेबद्दल जाणून घेतील. यापूर्वी सरकरने जारी केलेल्या २०२० च्या एका प्रेस नोट ३ च्या माध्यमातून भारतसह जमिनी सीमा असलेल्या देशांमधील सर्व गुंतवणूकीसाठी सरकारी मार्गाने मंजुरी अंतर्गत मान्यता दिली होती.

भारतातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील क्षेत्रात चिनी कंपन्यांचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. नंतर लडाखमधील भारत आणि चीन यांच्यात झालेल्या सीमा संघर्षामुळे एक आधार मिळाला, जेथे अधिकृत संस्था शेजारच्या देशातून होणारी गुंतवणूक आणि आयात रोखण्यासाठी अतिरिक्त उपायांवर विचार करत आहेत.

पाच राज्यात आहेत खाणी

पहिल्या टप्प्यातील व्यावसायिक कोळसा लिलावा अंतर्गत एकूण १७ अब्ज टन कोळसा साठा असलेल्या ४१ खाणी सुरू केल्या आहेत. यात मोठ्या आणि छोट्या दोन्ही खाणींचा समावेश आहे. या खाणी पाच राज्यात आहेत. ही राज्ये छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिसा आहेत.