India Book of Records | कौतुकास्पद ! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या 7 वर्षीय मुलाच्या विक्रमाची नोंद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिचंवड आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (Police Inspector Devendra Chavan) यांच्या 7 वर्षाच्या मुलाच्या विक्रमाची (Record) नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book of Records) करण्यात आली आहे. रिआन देवेंद्र चव्हाण (Rian Devendra Chavan) याने 7 व्या वाढदिवसाच्या दिवशी 51 किमी सायकलवर पुणे दर्शन केले आहे. रिआन याने सी.एम.ई. खडकी, लाल महाल, शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती, डेक्कन, औंध निगडी अशी सायकल चालवून विक्रम (India Book of Records) केला आहे.

 

 

रिआनचे वडिल पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी सांगितले, रिआनचा लहानपणापासून साहसी खेळाकडे कल आहे. त्याने वयाच्या तिसऱ्या वर्षी सिंहगड ट्रेक (Sinhagad Trek) केला. त्यानंतर त्याने तिकोना, विसापुर, लोहगड, शिवनेरी, तोरणा, सरसगड, असे किल्ले सर केले आहेत. तसेच ज्यावेळी त्याच्या मनात येईल त्यावेळी तो घराजवळील घोरावडेश्वर, चौराईमाता डोंगर, डोंगरवाडी, फिरंगाईमाता मंदिर, दुर्गा टेकडी ट्रेक करत असतो. (India Book of Records)

 

 

 

 

 

 

याशिवाय रिआने पाच किमीच्या सहा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये (Marathon Competition) भाग घेऊन त्या पूर्ण केल्या आहेत. पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या 5 किमी मॅरेथॉन स्पर्धा त्याने केवळ 34 मिनीटांत पूर्ण केली आहे. तसेच स्पोर्ट्स फॉर ऑल-2022 या 8 वर्षाखालील 50 मीटर रनिंग मध्ये त्याने तिसरा क्रमांक पटकावून ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे. इआन सध्या केंद्रीय विद्यालय देहुरोड नं.1 शाळेत दुसरी मध्ये शिकत आहे. त्याच्या या यशाने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

 

Web Title :  India Book of Records | Admirable! Police Inspector Devendra Chavan’s
7-year-old son records record in India Book of Records

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील कांदा व्यापार्‍याला 46 लाखांचा गंडा; परदेशात निर्यात करण्याच्या नावाखाली फसवणूक

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | सहा महिने झाले सरकारची नुसतीच घोषणा;
खेळाडूंचा गौरव ही नाही आणि पुरस्काराची रक्कम सुध्दा नाही

Vanita Kharat | रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ‘ही’ अभिनेत्री झळकणार; ट्रेलर मध्ये दिसली झलक