Ethanol Blending Petrol : मोदी सरकारने डेडलाईन बदलली, पेट्रोलबाबत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Ethanol Blending Petrol : मोदी सरकारने पेट्रोलच्या आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण Ethanol Blending Petrol  करण्याचा आदेश काढला आहे. यापूर्वी हे 2025 पर्यंत लक्ष्य गाठण्याचे ठरवले होेते. परंतु आता 2 वर्षे अगोदरच लक्ष्य गाठण्याचे निश्चित केले आहे. मात्र सरकारने दिलेले लक्ष्य गाठणे सध्या तरी अशक्य वाटत आहे. कारण ज्या गतीने निर्मितीक्षमता वाढणे अपेक्षित होते. तेल कंपन्यांनाही इथेनॉलची साठवण क्षमता वाढवावी लागणार आहे. यंदाच साठवणक्षमता कमी असल्याने इथेनॉल उचलण्यास कंपन्या उशीर करत असल्याची तक्रार उत्पादक कंपन्यांनी केली होती.

सध्या देशाची इथेनॉल निर्मितीची क्षमता 425 कोटी लिटरची आहे.
पुढील वर्षापर्यंत त्यात आणखी 50 कोटी लिटरची वाढ होण्याची शक्यता आहे.
तेल कंपन्यांनी इथेनॉल कंपन्यासोबत 325 कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे करार केले आहेत.
24 मेपर्यत यातील 145 कोटी 38 लाख लिटरचा इथेनॉल पुरवठा केला आहे.
सध्या देशात 8.5 टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते. सध्याची इथेनॉल उत्पादनाची गती पाहता 2022 पर्यंत हे प्रमाण 10 टक्क्यांवर जाईल.

2023 मध्ये ते 20 टक्क्यांपर्यंत घेऊन जायचे असल्यास देशाला 850 कोटी लिटर इथेनॉलची गरज भासणार आहे. तर उत्पादनक्षमता 1000 कोटी लिटरपर्यंत न्यावी लागणार आहे. याचाच अर्थ इथेनॉलची उत्पादनक्षमता दुप्पट करावी लागेल. केंद्राने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी 2018 मध्ये नवे धोरण जाहीर केले आहे. यामुळे 2017 मध्ये 150 कोटी लिटर असलेली उत्पादनक्षमता आज 425 कोटी लिटरवर गेली आहे. दरम्यान फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशनची आज शुक्रवारी ऑनलाइन बैठक होणार आहे.

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !