‘समाजवादी’शी ‘हातमिळवणी’ ही ‘घोडचुक’च : मायावती

नवी दिल्ली वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत सपा -बसपा एकत्रित लढले परंतु त्याच्या पदरी घोर निराशा आली (बसपा -१० तर सपा -५ ) इतक्या कमी जागा त्यांना मिळाल्या यामुळे बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सपा बद्दल खळबळजनक दावा केला आहे.

त्या म्हणाल्या कि,समाजवादी पार्टीसोबत ‘महागठबंधन’ करणे आमची सर्वात मोठी चूक होती, बसपा बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यामुळे बसपाचे नेते देखील आश्चर्यचकित झाले.

पुढे बोलताना मायावती म्हणाल्या कि, ताज कॉरिडॉरच्या केसमध्ये मला अडकविण्यात भाजप आणि मुलायम सिंग यांचा हात होता. तसेच लोकसभा निवडणुकीत पदरी पडलेला निराशाजनक पराभव हा अखिलेश यादव यांच्यामुळेच झाला असा आरोपही त्यांनी केला.तसेच अखिलेश यांच्या राजकीय विचारांवर देखील मायावतींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना सपा ने त्यांच्या प्रचारात आरक्षणाला विरोध केला होता. त्यामुळेच त्यांना दलित आणि मागासवर्गीयांनी मतं दिली नाहीत, असेही मायावती म्हणाल्या.

लोकसभेत यादवांनी देखील आपली मतं समाजवादी पक्षाला दिलेली नाहीत. जर मतं दिली असती तर अखिलेश यांच्या परिवारातील सदस्य पराभूत झाले नसते. शिवपाल यादव यांच्या पक्षामुळे यादवांच्या मतांचे विभाजन झाल्याचे देखील मायावती म्हणाल्या.तसेच बसपाचे प्रदेशाध्यक्ष आरएस कुशवाहा यांना सलीमपूरमधून समाजवादी पार्टीचे नेते राम गोविंद चौधरी यांनीच पराभूत केलं.

त्यांनी समाजवादी पक्षाची मतं भाजपकडे वळविली. मात्र तरीही अखिलेश यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप मायावती यांनी केला.तसेच अखिलेश यांच्या सरकारच्या काळात दलितांवर झालेल्या अत्याचारांमुळेच त्यांनी सपा ला धडा शिकवला .

आरोग्य विषयक वृत्त

अर्धशिशी म्हणजे काय ? जाणून घ्या, करा हे उपाय

थायरॉइडने त्रस्त आहात ? घरगुती उपाय करून समस्या सोडवा

मुतखड्याच्या असह्य वेदना टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या