चीन-पाकिस्तानशी एकाचवेळी युद्ध कधीही जिंकू शकणार नाही भारत : ग्लोबल टाइम्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे अनेक संरक्षण विश्लेषक आणि लष्करी अधिकार्‍यांनी ही शंका जाहीर केली आहे की, जर चीनसोबत भारताचे युद्ध झाले तर पाकिस्तान सुद्धा त्याच्यासोबत येऊ शकतो. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, असे सहज शक्य आहे की, भारताला चीन-पाकिस्तानसोबत एकाचवेळी लढावे लागेल. यासाठी भारतीय लष्कराला आणखी मजबूत करण्याची गरज आहे.

विद्यमान सीडीएस आणि भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सुद्धा हे म्हटले आहे की, भारत दोन आघाड्यांवर युद्धासाठी पूर्णपणे तयार आहे. चीन आणि पाकिस्तान दोघांशी भारताचे युद्ध झालेले आहे. 1962 मध्ये चीनसोबत युद्ध झाले तेव्हा पाकिस्तान अलिप्त राहिला होता. 1965-71 मध्ये पाकिस्तानशी युद्ध झाले तेव्हा चीन अलिप्त राहिला होता आणि कुणाची बाजू घेतली नव्हती. परंतु आता स्थिती बदलली आहे. तेव्हा अमेरिकेचा दबाव होता यासाठी चीन आणि पाकिस्तान अलिप्त होते. अनेक विश्लेषकांचे म्हणणे आहे की, अमेरिकेच्या सध्याच्या स्थितीत ना पाकिस्तान त्याचे ऐकणार, आणि ना चीन. भारताशी तणाव असताना चीनी मीडियामध्ये सुद्धा भारताशी दोन आघाड्यांवरील युद्धाच्या तयारीवर चर्चा होऊ लागली आहे.

चीनी सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने याबाबत एक लेख प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारताचा पाकिस्तान आणि चीनसोबत सुरू असलेल्या तणावाचा उल्लेख करत म्हटले आहे की, भारतासाठी दोन्ही आघाड्यांवर युद्धा जिंकणे अशक्य आहे.

वृत्तपत्राने लिहिले आहे की, पाकिस्तानी लष्कर दररोज एलओसीवर भारतावर सीझफायरचे उल्लंघन करण्याचा अरोप करत आहे. भारताने ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरमध्ये फुटीरतावादी मजबूत होण्याच्या भितीने काश्मीरचा विशेष दर्जा नष्ट केला, तेव्हापासून दोन्ही देशांच्या नात्यात तणाव आहे. नवी दिल्लीला वाटते की, क्षेत्रात जेवढे पाकिस्तानी आहेत, सर्व दहशतवादी आहेत, याच कारणामुळे भारताने काश्मीरमध्ये खुप आक्रमक धोरण अवलंबले आहे.

ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, ऑगस्ट 2019 मध्ये भारताच्या या पावलानंतरही पाकिस्तानने संयम बाळगला आहे. पाकिस्तान भारताच्या तुलनेत लष्कराच्या बाबतील इतका मजबूत नाही, परंतु काश्मीर पाकिस्तानसाठी संवेदनशील मुद्दा राहिला आहे. जर पाकिस्तानच्या सरकारने काश्मीरबाबत कठोर भूमिका घेतली तर आपल्या देशातच त्याची लोकप्रीयत कमी होईल. याच कारणामुळे पाकिस्तान भारताच्या प्रत्येक आक्रमक पावलावर टिका करत आहे आणि गरज भासल्याच त्याच्याविरूद्ध अ‍ॅक्शन सुद्धा घेतो.

वृत्तपत्राने प्रश्न विचारला आहे की, चीनसोबत भारताचा वाद सहजपणे सुटत नसताना भारत अशावेळी पाकिस्तानच्या विरोधात इतका आक्रमक का आहे? ग्लोबल टाइम्सने लिहिले, बहुतेक यासाठी की, भारतीय लष्कर आणि सरकारमध्ये पाकिस्तानबाबत एक प्रकारचा श्रेष्ठतेचा भाव आहे. अशा विचारामुळेच भारत आपल्या शेजारी देशावर स्ट्राइक करत आहे. भारताच्या या पावलांच्या मागे हिंदू राष्ट्रवादाची भावना असणे सुद्धा एक कारण आहे.

ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, चीन आणि पाकिस्तानसोबत वादाशिवाय, भारताचा नेपाळसोबत सुद्धा वाद आहे. भारतीय आर्मीने दावा केला आहे की, ते अडीच आघाड्यांवर युद्धासाठी पूर्णपणे तयार आहेत. अडीच आघाड्या म्हणजे चीन, पाकिस्तान आणि आपल्या अंतर्गत सुरक्षा धोक्यांसोबत. परंतु हे एक तथ्य आहे की, अशा आव्हानाला तोंड देण्यात भारतीय लष्कर सक्षम नाही. अनेक आघाड्यांवर युद्ध लढणे कोणत्याही देशासाठी गंभीर आव्हान असते.

ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, आपली सैन्य क्षमता वाढवण्यासाठी भारत रशिया आणि पश्चिमी देशांकडून शस्त्र खरेदी करत आहे आणि पश्चिमी देशांसह अंतरराष्ट्रीय गटांकडून समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मागील काही वर्षात भारत अमेरिकेकडे झुकत असल्याचे दिसत आहे. भारताने अमेरिका आणि त्याच्या जवळच्या देशांशी सैन्य सहकार्य वाढवण्यासह अनेक सैन्य करारांवर हस्ताक्षर केले आहेत. मात्र, या सर्व पावलांशिवाय भारत एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानशी युद्ध लढू शकत नाही.

ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, जर भारताने चीन आणि पाकिस्तानसोबत युद्धा केले किंवा मोठा सैन्य संघर्ष झाला तर कोणताही देश सशर्त शस्त्र उपलब्ध करण्याशिवाय भारताच्या मदतीला पुढे येणार नाही.

चीनी वृत्तपत्राने लिहिले आहे की, भारताचे सध्याचे शेजारी देशांची असलेले धोरण, विशेषकरून चीन आणि पाकिस्तानबाबत भारताच्या परराष्ट्र धोरणाने त्याला एका अप्रिय स्थितीवर आणून उभे केले आहे.

ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, भारत आपल्या शेजारी देशांसोबत सकारात्मक आणि मित्रत्वाचे नाते कायम ठेवू शकलेला नाही. कारण भारताला शक्तीशाली देश होण्याच्या मानसिकतेने घेरले आहे. दक्षिण आशियात त्याला आपले अधिपत्य हवे आहे आणि त्याला वाटते की, सर्व शेजारी राष्ट्रांनी त्याचे नेतृत्व मान्य करावे.

वृत्तपत्राने म्हटले की, चीनसोबत खराब संबंधात इतर अनेक फॅक्टर्सची महत्वाची भूमिका आहे. 1962 मध्ये भारत चीनशी युद्धात पराभूत झाला होता आणि हा पराभव भारतीय अजून विसरलेले नाहीत. दुसरी बाब म्हणजे, चीनची भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानशी मैत्री आहे. भारताने जेव्हा जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा नष्ट केला, तेव्हा चीनने पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत हा मुद्दा उचलला, ज्यामुळे भारतावर दबाव आला. याशिवाय, चीनने दक्षिण आशियाई देशांसोबत सहकार्य वाढवले आहे. भारत याकडे आपल्या प्रभाव क्षेत्रात वाढती दखल म्हणून पहातो.

एलएसीवर भडकावण्याची कारवाई करणार्‍या चीनच्या मीडियाने भारतावर आरोप केला आहे की, भारत क्षेत्राची शांतता आणि स्थिरतेसाठी धोका बनला आहे. या लेखात सल्ला देण्यात आला आहे की, जर भारताला खरोखरच शक्तीशाली बनायचे असेत तर त्याने आपल्या शेजारी देशांशी नाते सुधारण्याची गरज आहे.